कांदा पुन्हा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आणणार हसू; परदेशात कांद्याची मागणी वाढल्याने भाव वाढण्याचे संकेत

0
19

द पॉईंट नाऊ ब्युरो : कांद्याच्या बाबतीत शेतकरी वर्गासाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. जागतिक स्तरावर कांद्याची मागणी वाढल्याने नाशिकच्या लासलगाव येथील सर्वात मोठ्या कांदा बाजारपेठेतून कांदा बांगलादेशला निर्यात करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लासलगाव येथील रेल्वे स्टेशनमधून जवळपास 480 मेट्रिक टन कांदा हा बांगलादेशला रवाना करण्यात आला आहे. आणि रेल्वे द्वारे कांदा निर्यात करण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी भाजीपाला निर्यात केला जात होता.

कांद्याची वाढती मागणी पाहता कांद्याचे भाव वाढू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे. आणि असे झाल्यास ती कांद्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकरी वर्गासाठी नक्कीच दिलासादायक बाब असेल. कारण मागील काही काळापासुन कांद्याचे भाव खाली आलेले असल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे. त्यामुळे एवढ्या मेहनतीने पिकवलेल्या कांद्याला भावच भेटत नसेल तर काय उपयोग असा सवाल शेतकरी वर्ग करत होता. मात्र आता बाहेर देशात करण्यात आलेली कांद्याची निर्यात नक्कीच दिलासा देणारी आहे.

कोसळलेल्या कांद्याच्या भावाने हैराण झालेले शेतकरी यामुळे नक्कीच सुखावणार आहेत. आता कांद्याची मागणी अशीच वाढत राहिली आणि कांदा परदेशात निर्यात होत राहिला, तर कांद्याचे भाव पुन्हा एकदा शेतकरी वर्गाच्या चेहऱ्यावर हसू आणतील हे नक्की.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here