द पॉईंट नाऊ ब्युरो : गुणरत्न सदावर्ते कोणत्या वेळी काय वक्तव्य करतील याचा नेम नाही. आता त्यांनी मी मुंबईला स्वतंत्र करणार असं धक्कादायक विधान केलं आहे.
महाराष्ट्रात वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी अनेक जण आजवर बोलत आले आणि अजूनही बोलत आहेत. यात प्रामुख्याने नाव येते ते श्रीहरी अणे यांचे. आता गुणरत्न सदावर्ते यांनी देखील याबाबत विधान केले आहे. येत्या काळात आपण विविध चळवळीचं नेतृत्व करणार आहोत. श्रीहरी अणे यांच्यासोबत बोलून चळवळीची दिशा ठरवणार आहोत. मुंबई शहराला देखील स्वतंत्र करणार आहोत.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने, ती स्वतंत्र असायला हवी, असं सदावर्ते यांचं मत आहे. परंतु, सदावर्ते यांना अचानकच काही गोष्टींची लहर कशी येते, वातावरण शांत झालेलं असलं किंवा त्यांच्या नावाची चर्चा निवळली की सदावर्ते प्रकाशझोतात येण्यासाठी पुन्हा असं काही विधान करून चर्चेत येण्याचा प्रयत्न करतात का? असा प्रश्न विचारला जातोय.
वकील गुणरत्न सदावर्ते यांनी याआधी देखील अनेक वेळा वादग्रस्त आणि धक्कादायक विधाने करून वाद ओढवून घेतला आहे. मराठा आरक्षण मुद्दा, एस. टी. कर्मचारी आंदोलन अशा मुद्द्यांच्या वेळी सदावर्ते चर्चेत होते. मात्र सध्या चर्चेत यायला काही मुद्दा नाही, म्हणून तर हे अचानक केलेले धक्कादायक विधान नाही ना? अशी चर्चा होऊ लागली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम