समाजकार्यासाठी प्रेरणा देणारा पुरस्कार – पगार

0
47
डॉ. नूतन आहेर ( जि.प. सदस्या, देवळा ) देवळा ; नूतन आहेर यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल सत्कार करताना जिल्हाध्यक्ष अड रवींद्र पगार समवेत डॉ तुषार शेवाळे, सुनील आहेर, पुरुषोत्तम कडलग ,विलास देवरे आदी (छाया - सोमनाथ जगताप )

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नूतन आहेर यांना मिळालेेला मानद डॉक्टरेट हा पुरस्कार त्यांना समाजासाठी यापुढेेही चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देणारा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार यांनी केले. जिल्हा परीषद सदस्या नूतन आहेर यांना नेल्सन मंडेला नोबेल शांतता पुरस्कार व मानद डॉक्टरेट मिळाल्याबद्दल आयोजित नागरी सत्कार सोहळयात ते बोलत होते.

डॉ. नूतन आहेर ( जि.प. सदस्या, देवळा )
देवळा ; नूतन आहेर यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल सत्कार करताना जिल्हाध्यक्ष अड रवींद्र पगार समवेत डॉ तुषार शेवाळे, सुनील आहेर, पुरुषोत्तम कडलग ,विलास देवरे आदी (छाया – सोमनाथ जगताप )

वाखारी गटाच्या जि.प. सदस्या नूतन आहेर यांनी ग्रामविकास, राजकीय, व सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी अमेरीकन युनिव्हर्सिटी फॉर ग्लोबल पीस अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट च्या संयुक्त विद्यमाने अहमदाबाद येथे नेल्सन मंडेला नोबेल शांतता पुरस्कार सोहळ्यात नुकतीच डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. यानिमित्त देवळा तालुका नागरी सत्कार सोहळा समितीच्या वतीने डॉ. नूतन आहेर यांना सन्मानित करण्यात आले.

वत्सला लॉन्स येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अड. रविंद्र पगार होते.यावेळी कादवा साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, माजी आमदार संजय चव्हाण, मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, रायुकाँचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, तालुकाध्यक्ष सुनिल आहेर, माधवराव बनकर, उमराणे बाजार समितीचे माजी सभापती विलास देवरे, दगा निकम, शैलेश सुर्यवंशी, संदीप पवार, लालचंद सोनवणे, माजी सभापती केशरबाई आहीरे, उपसभापती धर्मा देवरे, अमोल पाटील, महेंद्र काळे, प्रफुल्ल पगार, दशरथ निकम आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सत्कार समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.

किशोर खरोटे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. तुषार शेवाळे, मा.आमदार संजय चव्हाण, रायुकॉ तालुका अध्यक्ष सुनिल आहेर, जि प सद्स यशवंत सिरसाठ, अमोल पाटील, प्रभाकर पाटील, उपसरपंच भाऊसाहेब आहेर, आदींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गोरख निकम मांनी केले.

यावेळी राकाँचे शहर अध्यक्ष दिलीप आहेर, भाऊसाहेब देवरे, संतोष शिंदे, सचिन सूर्यवंशी , दिपक देशमुख, सनी आहेर, निंबा निकम,रिंकु जाधव, दशरथ पुरकर, प्रदिप सोनवणे आदी सत्कार समिती सदस्यांसह देवळा, सटाणा, व चांदवड तालुक्यातील महिला व नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.

समाजासाठी काम करत असतांना संघर्ष करावा लागला. परंतु जनतेसाठी कामाची उर्जा, आशिर्वाद, व पाठबळ तसेच हेतू प्रामाणिक व शुध्द असल्याने जनता माझ्यासोबत होती म्हणूनच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी ह्या नात्याने सर्वाधिक विकास कामे करता आली, हा पुरस्कार हा सामान्य जनतेचा गौरव असल्याचे मी मानते.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here