
देवळा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त देवळा येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा व जि प च्या माजी सभापती उषाताई बच्छाव यांच्या हस्ते देवळा बसस्टँडवर ज्येष्ठ महिला (वृद्ध )यांना काठी वाटप करण्यात आल्या .

याप्रसंगी तालुका अध्यक्ष यशवंत शिरसाठ , युवक तालुका अध्यक्ष सुनिल आहेर ,शहर अध्यक्ष दिलीप आहेर, मनोज गुजरे, महिला शहर अध्यक्षा वनिता शिंदे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . पक्षाच्या वर्धापनदिन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम