अपघात! बसच्या चाकाखाली सापडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

0
29

द पॉईंट नाऊ ब्युरो : पुण्यात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका 12 वर्षीय मुलाचा स्कूल बसच्या चाकाखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्याच्या वडगाव खुर्द येथे हा प्रकार घडला आहे.

पुण्यातील वडगाव खुर्द येथे दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक स्कूल बस वळण घेत होती. यादरम्यान, 12 वर्षीय अर्णव अमोल निकम या विद्यार्थ्याचा स्कूल बसच्या मागच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला.

शाळेच्या विद्यार्थ्यांना स्कूल बस आली होती. सर्व विद्यार्थी बसमधून उतरले व बस वळण घेऊ लागली. यावेळी अर्णव हा बसच्या मागच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

याप्रकरणी धनकवडी येथील 49 वर्षीय बसचालक दत्तात्रय लक्ष्मण परेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

शाळेद्वारे विद्यार्थ्यांना घेण्यासाठी व सोडण्यासाठी बसची सोय केलेली असते. मात्र विद्यार्थी घरी पोहोचेपर्यंत किंवा शाळेत सुरक्षित पोहोचेपर्यंत शाळेची जबाबदारी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची असते. मात्र इथे हगर्जीपणामुळे हा प्रकार घडून आल्याची चर्चा असून, संताप व्यक्त होत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here