देवळा ; तालुक्यातील निंबोळा येथे सोमवारी (१३) रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्या अभावी पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन शेतात घुसूल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे . देवळा तालुक्यातील गेल्या चार दिवसांपासून मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली आहे . हा पाउस तालुक्यातील बहुतांश गावात झाला आहे .

सुरवातीच्या पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली . यामुळे अनेक ठिकाणी पत्रे उडून घरांची पडझड झाली. कांदे भिजले, नाले व बांध फुटले ,झाडे उन्मळून पडली आहेत. यामुळे वीज पुरवठा देखील बंद होता . परिणामी नागरिकांची पुरती धावपळ उडाली . आज मंगळवारी पावसाने विश्रांती घेतली आहे . सोमवारी तालुक्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार व मध्यम स्वरुपात पाऊस झाला. निंबोळा येथे मुसळधार पाऊस झाला.
नाला बुजला त्यावर अतिक्रमण झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येऊन शेतीत घुसून नुकसान झाल्याचा प्रकार घडला आहे . पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी संबंधित नाला खुला करून द्यावा याकामी प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी ,अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम