देवळा ; तालुक्यातील वरवंडी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी संदीप दशरथ चव्हाण यांची तर व्हा . चेअरमन पदी सुशिला बाई शांताराम चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली .या विकास संस्थेची पंचवार्षिक निवडणूक गेल्या महिन्यात बिनविरोध पार पडली .
मंगळवारी (१४) रोजी चेअरमन ,व्हा चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी सहकार अधिकारी वसंत गवळी यांच्या अध्यक्षतेखाली संस्था कार्यालयात संचालक मंडळाची बैठक बोलाविण्यात आली . यावेळी सर्वानुमते चेअरमन पदी संदीप चव्हाण यांची तर व्हा चेअरमन पदी सुशीलाबाई चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली . याकामी सचिव दीपक पवार यांनी सहाय्य केले .
याप्रसंगी संचालक सर्वश्री आधार शंकर शिंदे , शांताराम रामदास चव्हाण , चिंतामण सुकदेव शिंदे , दौलत लाला आहेर , तुळशीराम महादु वाघ, गंगाधर नामदेव वाघ , देवाजी मणिराम चव्हाण, शकुंतला नानाजी पवार , दशरथ पुंडलिक बनकर, बाळु नारायण बच्छाव , मोतीराम दामू गोसावी उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, भाजपचे तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण , शिवाजी शिंदे ,अमलोक शिंदे , विठ्ठल चव्हाण , बापु चव्हाण ,रावसाहेब वाघ , लक्ष्मण शिंदे, सरपंच आबा शिंदे , विलास शिंदे , शांताराम चव्हाण ,भारत वाघ , सदाशिव शिंदे समाधान पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप बच्छाव आदींनी अभिनंदन केले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम