द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; कोठुरे येथील जि.प. कोठुरे फाटा वस्ती शाळेतील शिक्षक रामदास
चोभे यांना गिरणा गौरव प्रतिष्ठान व साप्ताहीक नो प्रॉब्लेम यांच्या वतीने सटाणा येथे शिक्षक दिनी त्याना गौरविण्यात आले. गेल्या वीस वर्षापासून साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येत आहेत.
सदर कार्यक्रम पुणे विद्यापीठाच्या सदस्या तथा कर्मवीर शांताराम बापू वावरे महाविद्यालयाच्या
प्राचार्या डॉ. ज्योत्स्ना सोनखासकर, ज्येष्ठ साहित्यिक ब ख्यातनाम सूत्रसंचालक रवींद्र मालुंजकर, ज्येष्ठ कवी शं.क. कापडणीस, विस्तार
अधिकारी रघुनाथ सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत हा साने गुरुजी आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला यावेळी जिल्ह्यातील २४ शिक्षकांना २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल त्याना पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.
कोठुरे ग्रामस्थांनाच्या वतीने तसेच त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांना विविध शैक्षणिक व सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रामधून कौतुक करण्यात आले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम