गुप्तधनासाठी नवऱ्याने बायकोचाच नरबळी देण्याचा केला प्रयत्न

0
24

द पॉईंट नाऊ ब्युरो : माणसाच्या मनात काही काळं-बेरं आलं की तो आपल्या मनातली फालतू अपेक्षा पूर्ण करवून घेण्यासाठी अघोरी विद्येचा प्रयोग करण्याचा प्रयत्न करतो. अर्थात, चुकीच्या मार्गाला लागतो. यवतमाळमध्ये असाच प्रकार घडला आहे.

यवतमाळ जिल्ह्याच्या केळापूर येथे गुप्तधन मिळवण्यासाठी एका नवऱ्याने स्वतःच्याच बायकोचा बळी देण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी नवरा प्रवीण शेगर याच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेगर कुटुंबातील लोकांना गुप्तधन प्राप्त करण्याचे वेड लागले होते. आणि त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ पाहत होते. यासाठी त्यांनी घरात सुनेचा पूर्णतः छळ करणे सुरू केले होते. तर गुप्तधन मिळवण्यासाठी या सासरच्यांनी सुनेचा नरबळी देण्याची तयारी केली होती. याप्रकरणी जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत पतीसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

माणसाला आज धनाची एवढी लालसा लागली आहे की, तो धन प्राप्त करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचा प्रयत्न करतो. आणि याचाच प्रत्यय यवतमाळमध्ये आला.

सध्या देशभरात जादूटोणा नावाचा प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जादूटोणा करून घरात सौख्य प्राप्त होते, धन प्राप्त होते अशा एक ना अनेक लालसा माणसाला निष्ठुर, क्रूर बनवत चालल्या आहेत. यामुळे मनुष्य अगदी कोणत्याही थराला जाऊ लागला आहे. आजच्या आधुनिक युगात देखील अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने, चिंता व्यक्त होत आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे वारंवार अशा अनेक प्रकारांबाबत वाचा फोडण्याचा, अंधश्रद्धेचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र तरी देखील हे प्रकार काही केल्या कमी होत नाहीत.

महाराष्ट्रात आत्तापर्यंत लालसेपायी अनेक वेळा नरबळी देण्याचे प्रकार घडले आहेत. कुठे पोटच्या मुलांचा, कुठे बायकोचा, कुठे मुलीचा, तर कुठे आईचा देखील बळी देण्याच्या प्रयत्नाचे अनेक प्रकार घडले आहेत. आज या आधुनिक युगात देखील लोक अजून सुद्धा अशा प्रकारांकडे वळत आहेत.

आज विज्ञान इतके पुढे गेले आहे. मनुष्य चंद्रावर जाऊन पोहोचला आहे. तरी देखील मनुष्य मात्र ग्रह – ताऱ्यांच्या मध्येच अडकून पडला आहे. त्यात तो इतका गुरफटला आहे की, त्याला कोणतीही सीमा राहिलेली नाही. आणि याचमुळे असे प्रकार वारंवार घडतांना दिसून येत आहेत. ही एक चिंतेची बाब आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here