श्रीगणेशाचे अध्यात्मिक रहस्य – राजयोगीनी ब्रह्माकुमारी पुष्पा दिदी

0
23

द पॉईंट नाऊ मीडिया ; भारत देशाची संस्कृती सर्वात प्राचिन असून जगभर प्रसिध्द आहे. सुख कर्ता दुख हर्ता अशी गणरायाची आपण आरती करतो मात्र कोणत्या काळात गणपतीने सर्व भक्तांना दु:ख पासून विमोचन केले. या सर्व प्रश्नांची उकल करणे क्रमप्राप्त ठरते.

राजयोगीनी ब्रह्माकुमारी पुष्पा दिदी
(प्रजापती ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वाविद्यालय नाशिक)

आपल्या शास्त्रांमध्ये अनेक गोष्टी या अलंकृत केलेल्या आहेत. या गोष्टी काही वेळेस प्रतिकात्मक असतात. गणपती या शब्दातील ‘गण’ म्हणजे समुह, समाजातील सर्व समुहांचा, पर्यायाने सर्व जनतेचा पती म्हणजे गणपती होय.

गणाधिश म्हणजे सर्व गणांचा अधिपती असाच होतो.
गणपतीच्या निर्मिती विषयी जी अख्यायीका सांगितली जाते त्यातही खूप मोठा गर्भितार्थ सामावलेला आहे. यात सांगितले जाते की पार्वती देवी ने आपल्या शरीराच्या मळापासुन एक प्रतिकृती बनविली. तसे बघितले तर प्रत्येक विनाशी शरीर हे विकारांच्या संपर्कातुनच बनते, ते पंचतत्व – पृथ्वी, जल, वायु, आकाश, प्रकाश अग्नी चा एक भाग असते. या शरीरात विराजमान असते ती चैतन्य शक्ती आत्मा. पुढे या कथेत असे दर्शविले आहे की भगवंत येवुन त्या पार्वतीच्या बाळासोबत युध्द करतात व त्याचे डोके धडापासून अलग करतात.

यात प्रतिकात्मक गोष्ट अशी की भगवंत हा गुणांचा सागर आहे. साधारण मनुष्याला देवतुल्य बनविण्यासाठी भगवंत त्याचे अवगुण व विकाररूपी मस्तक छाटुन त्या जागी गुणांनीयुक्त असे डोके बसवितात. असे कर्तव्य भगवंत कलयुगाच्या अंतिम प्रहर मध्ये येवुनच करतात. आपण बघत आहोत, आज सर्वत्र दुराचार, अत्याचार, अनाचार व्यभिचार वाढलेला आहे. मनुष्य अतिशय विकारी झाला आहे . अशा परिस्थितीत स्वयं निराकार शिव परमात्मा अवगुण रूपी डोके छाटुन पुन्हा सद्गुणी रूप देण्यासाठी पुन्हा सक्रीय झाले आहेत. हे सत्वगुणी रूप कसे आहे ते पुढे दिलेल्या श्री गणेशाच्या अवयव व आयुधांवरील प्रतीकांना समजून घेतल्यावर स्पष्ट होते.

श्री गणेशाच्या अवयव व आयुधांवरील प्रतीकांचे रहस्य

सोंड- गणपती देवतेला दाखविण्यात आलेली सोंड ही विकारांना समुळ नष्ट करण्याचे व सूक्ष्म गुणांना धारण करण्याचे प्रतिक आहे. ज्याप्रमाणे सोंड मोठ मोठी झाडे समुळ उपटु शकते त्याच प्रमाणे ज्ञानी व्यक्तीने आपल्यातील अवगुणांना समुळ नष्ट करायला हवे.

कान- गणपती चे कान हे सुपासारखे असतात. हे कान नेहमी हालत असतात. ज्या प्रमाणे सुपातुन अनावश्यक कचरा बाजुला केला जातो, त्याच प्रमाणे आपण व्यर्थ गोष्टींना त्यागले पाहिजे. तसेच अनावश्यक विकारी व व्यर्थ गोष्टींना न एकता सद्गुणी व वैचारीक गोष्टींना ऐकण्याचे प्रतिक म्हणजे गणरायाचे कान होय.

डोळे- गणपतीचे डोळे हे सुक्ष्म गोष्टींच्या चिंतनाचे प्रतिक आहे. ज्या प्रमाणे हत्ती आपल्या डोळयांनी सुई सारखी बारीक वस्तु बघु शकतो त्याच प्रमाणे आपल्यातील सुक्ष्म अवगुण शोधण्या चे प्रतिक म्हणजे डोळे होय.

दंत – आपल्या कडे एक म्हण आहे “याचे खाण्याचे व दाखविण्याचे दात वेगळे आहेत” अर्थात काही वेळेस सांसारीक जबाबदादी संभाळतांना लोकांच्या संपर्कात आल्या नंतर वा आपल्या कनिष्ठ सहकार्यांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी प्रसंगी दंड करावा लागतो, परंतु अशा वेळेस स्नेह आणि कायदा याचा समन्वय साधत योग्य सल्ला देतात . ह्यातून आपण हे शिकले पाहिजे की स्व संरक्षणार्थ काहीवेळेस आपल्या शक्तीचे प्रदर्शन करावे लागते, परंतु त्यातही समोरच्या व्यक्तीचे नुकसान होणार नाही याची काळजी घेत ते कर्म केल्यास त्यातुन मोठा अनर्थ टाळता येतो. या साठी आपल्याला दाखविण्यापुरते बळ असणे आवश्यक असते याचे प्रतिक म्हणजे हस्ती दंत होय.

महोदर – ज्ञानवान व्यक्तीसमोर मान-अपमान, निंदा-स्तुती, जय पराजय, ची परिस्थिती सामावुन घेण्याचा गुण असतो. यासाठीच गणपतीला मोठे पोट दाखविण्यात आले आहे. बऱ्याच वेळेस म्हटले जाते कि या व्यक्तीच्या पोटात काही रहात नाही कोठे हि हा व्यक्ती बडबडून जातो. मोठे पोट हे सर्व गोष्टी सामाऊन घेण्याचे प्रतिक असून ज्ञानवान व्यक्ती वाचालपणा न करता आवश्यक बाबींचाच विचार करून अनेकांना योग्य सल्ला देतो.
हातातील आयुधे- देहाचे सर्व बंध तोडून भगवंताशी संबंध जोडतो हे गणपतीच्या हातात दर्शविलेल्या कुऱ्हाड व पाशातुन लक्षात येते. गणपतीच्या हातातील मोदक हे आनंदाचे प्रतिक आहे. गणपति नेहमी संतुष्ट राहुन अनेकांना संतुष्ट करतात याचे प्रतिक म्हणजे मोदक होय. गणपती सोबत रिध्दी सिध्दी या दोन पत्नी दाखविण्यामागचा उद्देश म्हणजे उपरोक्त सर्व गुण आपण आपल्यात धरण केल्यास आपल्याला ज्ञान व यश रिद्धी व सिद्धी अवश्य प्राप्त होते. . या सर्व प्रतिकातुन हाच निष्कर्ष निघतो कि आध्यात्मिक ज्ञानाचा व्यवहारात वापर करतो, स्वत: लक्ष्यस्वरूप बनुन सर्व सिध्दी म्हणजेच पवित्रता, सुख शांतीमय स्वर्गाचे राज्य प्राप्त करतो तोच अज्ञान रूपी डोके छाटुन ज्ञान व गुण युक्त डोके अर्थात सद् बुध्दी प्राप्त करतात.

आपल्याही जीवनात अशा प्रकारचे सकारात्मक परिवर्तन साधण्यासाठी जवळच्या ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रात अवश्य भेट द्या


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here