व्ही. के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्यू.कॉलेज भावडे येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

0
30

देवळा ; तालुक्यातील भावडे येथील व्ही. के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्यू.कॉलेच्या इयत्ता १२ वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले.

शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२मधे झालेल्या १२वी च्या विज्ञान शाखेच्या उच्च माध्यमिक बोर्डाच्या परीक्षेत विद्यालयाचा निकाल १००%लागला असून, विद्यालयातून कुमारी चेतना अर्जुन अहिरराव 77.83 टक्के गुण मिळवून प्रथम ,कु पियुष पोपट खैरणार 75.33 टक्के गुण मिळवून द्वितीय तर वैष्णवी सुनील बच्छाव 75.17 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे प्राचार्य वाघ एन .के. व पाटील एस.एन.तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बबलू देवरे,सागर कैलास आदींचे मार्गदर्शन लाभले, यशश्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन संजय देवरे, सचिव मीना संजय देवरे यांनी कौतुक करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here