उमराणे बाजार समिती कडून थकीत कांद्याचे पैसे मिळावेत ; संजय दहिवडकर

0
73
उमराणे बाजार समितीकडू थकीत कांदा विक्रीचे पैसे मिळावेत यासह उपोषणचे निवेदन तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना देतांना प्रहारचे संजय दहिवडकर व शेतकरी (छाया -सोमनाथ जगताप )

देवळा ; उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत नोटबंदी काळात विक्री केलेल्या कांद्याचे पैसे मिळावेत व संबंधित व्यापा-यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी ,या मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेचे देवळा तालुका अध्यक्ष संजय दहिवडकर यांनी मंगळवार (दि 12)जुलै पासून जुन्या तहसील कार्यालया समोर पुन्हा अर्ध नग्न उपोषणाचा इशारा दिला आहे . तशा आशयाचे निवेदन दहीवडकर यांनी बुधवारी (८) रोजी तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना दिले आहे .

उमराणे बाजार समितीकडू थकीत कांदा विक्रीचे पैसे मिळावेत यासह उपोषणचे निवेदन तहसीलदार विजय सूर्यवंशी यांना देतांना प्रहारचे संजय दहिवडकर व शेतकरी (छाया -सोमनाथ जगताप )

निवेदनाचा आशय असा की ,उमराणे येथील स्व निवृती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत नोटबंदी – काळात बळीराजा – शेतकऱ्यांनी आपल्या जमिनींवर पिकविलेला कांदा खरेदीदार व्यापा – यांना विकला आहे . मात्र अद्याप पावेतो ते पैसे संबंधित कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत . यासंदर्भात यापूर्वी प्रहार शेतकरी संघटनेच्या वतीने वेळोवेळी अनधिकृत बाऊंस धनादेश देऊन बळीराजा शेतकऱ्यांचा कांदा खरेदी फसवणूक करणा – या व्यापा यांवर कारवाई व्हावी याहेतुने आंदोलने छेडण्यात आलेली आहेत .लेखी आश्वासना पलीकडे यावर उपाय झाला नाही .

कष्टाचे पैसे मिळवण्यासाठी शेतकरी धडपडत जीवन जगत आहेत .मात्र प्रशासन सुस्त निद्रिस्त अवस्थेत आहे . याआधी मी बाजार समिती विरोधात सुतकही पाळलेले आहे अर्धनग्न अवस्थेत उपोषण सुद्धा केलेलं आहे मात्र याउपर प्रशासनाला जाग येत नसल्याने संजय दहिवडकर यांनी मंगळवार (दि 12) पासून पुन्हा अर्ध नग्न अवस्थेत उपोषणाला बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला दिला आहे .

यापूर्वी संबंधित व्यापाऱ्यांची मालमत्ता लिलाव प्रक्रिया राबविली गेली आहे . मात्र पुढील कारवाई बाबत प्रहार संघटना व शेतकऱ्यांना अनभिज्ञ ठेवण्यात आले आहे . असा पत्रकात आरोप करण्यात आला आहे . बुधवार (दि 08) रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना भेटून थकीत कांद्याचे पैसे कधी मिळणार आहेत .हे सांगा व आम्हाला न्याय द्या . असे सांगून निवेदन सादर केले . निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी ,पोलीस निरीक्षक आदींना दिली आहे .

निवेदनावर प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव , नानाजी आहेर ,संजय दहिवड कर ,चिंधा सोनवणे ,दिलीप सोनवणे ,नवनाथ साळुंखे ,दादाजी सोनवणे , निलेश खैरणार , कौतीक शिर्के ,महेंद्र आहेर आदींच्या सह्या आहेत .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here