इमारत कोसळून एकाचा मृत्यू तर 16 जण जखमी

0
28

द पॉईंट नाऊ ब्युरो : मुंबईमध्ये एक 3 मजली इमाइत कोसळली असून, यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईच्या वांद्रे येथील शास्त्रीनगर परिसरात ही घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या इमारतीलाच लागून असलेले घर एका बिल्डरने दोन दिवसांपूर्वी पाडले होते. त्यामुळे या इमारतीचा आधार एक प्रकारे काढला गेला. आणि याच कारणामुळे ही इमारत कोसळली. ज्यात एकाला आपला जीव गमवावा लागला. आणि 16 जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुंबईत अनेक मोठमोठ्या इमारती बांधल्या गेल्या आहेत. आणि वाढत्या रहदारीमुळे इथे रोज कोणत्या ना कोणत्या ठिकाणी इमारतींचे बांधकाम सुरूच असते. मात्र जागेच्या कारणावरून आज इथे अनेक इमारती, घरे ही एकमेकांना अगदी खेटून बांधलेली आहेत. ज्यामुळे त्या इमारती अथवा घरे एकमेकांच्या आधारावर उभे आहेत. बहुतांश इमारती जुन्या आहेत. याच कारणाने शास्त्रीनगर मध्ये देखील ही घटना घडल्याचे बोलले जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here