खर्डे विद्यालयाचा शंभर टक्के निकाल ; कु आकांक्षा गांगुर्डे प्रथम

0
43

देवळा ; खर्डे ता देवळा येथील इंदिरा गांधी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचा कला शाखेचा निकाल 100%लागला असून कु. आकांक्षा दादाजी गांगुर्डे या विद्यार्थिनीने ८०.५० गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला आहे.

मार्च २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेला एकुण ५६ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, कु वैशाली संतोष पगार हीने ७७.८३ गुण मिळवून दुसरा तर कू जाधव तुषार भाऊसाहेब याने ७३.३३ गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळविला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अँड. विजय पाटील , प्राचार्य भारत देवरे ,माजी उपसरपंच राहुल देवरे व मधुकर देवरे व विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा. आर. टी. सुर्यवंशी, प्रा. संजय आहेर व प्रा. सोनवणे एच. एन. यांनी मार्गदर्शन लाभले .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here