पुन्हा एक निर्भया बळी पडली; बसमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

0
28

द पॉईंट नाऊ ब्युरो : एक संतापजनक प्रकार बिहार राज्यात घडला आहे. पाटणा येथे जाणाऱ्या बसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बसचा चालक, वाहक आणि प्रवाशाने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

बिहारच्या पश्चिम चंपारणमध्ये बेतीया बसस्थानकात काही नराधमांनी एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. प्रवाशाने सदर पीडित मुलीला पाटण्याला नेतो म्हणून सांगत, बसमध्ये बसवले. त्यानंतर ही बस बायपास रोडवर टाकण्यात आली. यादरम्यान पीडित मुलीला गुंगीचे औषध टाकून कोल्ड्रिंक पाजण्यात आले. आणि त्यानंतर बेशुद्ध असतांना या पीडित मुलीवर प्रवासी, चालक आणि वाहकाने बलात्कार केला. या मुलीवर बलात्कार करून नराधमांनी मुलीला बसमध्ये कोंडत तेथून ते पसार झाले. मुलीला शुद्ध आल्यावर तिने बसचा दरवाजा ठोठावला असता, तिला नागरिकांनी बाहेर काढले. त्यानंतर याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोघांना अटक केली असून, चालक फरार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशात वाढत्या बलात्काराच्या घटनांनी देशाला पुरते हादरून सोडले आहे. एकामागे एक घडलेल्या या घटनांनी वाढती वासनांधता स्पष्ट दिसून येत आहे. या प्रकारच्या नराधमांना कायद्याचे कुठलेही भय राहिलेले नाही. हेच यावरून दिसून येते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here