पतीच्या जाण्याचा विरह; विवाहितेने 9 महिन्यांच्या मुलीसह संपवले जीवन

0
24

द पॉईंट नाऊ ब्युरो : एक अतिशय दुःखद घटना घडली आहे. यवतमाळ येथे एका 24 वर्षीय विवाहितेने आपल्या पतीच्या विरहात 9 महिन्यांच्या लहानग्या मुलीसह आत्महत्या केली. तर लहान मुलगी वाचली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील मार्डी येथे रोशनी आशिष झाडे या 24 वर्षीय विवाहितेने आपल्या लहानग्या मुलींसह आत्महत्येचा प्रयत्न केला. यात लहान मुलगी वाचली तर इतर दोघी मायलेकींचा मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी उघडकीस आली.

पती आशिष याचा मृत्यू झाल्या कारणाने रोशनी ही मानसिक तणावाखाली होती. मुलींचा सांभाळ आता कसा करायचा, या विवंचनेत तिने स्वतःसह आपल्या मुलीचेही जीवन संपवले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही महिलेच्या आयुष्यात तिचा खंबीर आधार हा तिचा पती असतो. मात्र तो आधारच निखळला आणि तोही आयुष्याच्या सुरुवातीलाच, तर तो त्या महिलेसाठी एक मोठा धक्का असतो. पती हा घराचा आधारस्तंभ असतो. जो साऱ्या घराची जबाबदारी सांभाळतो. मात्र तोच जर दूर गेला, तर कुटुंब संकटात येते. सर्वच प्रकारच्या समस्या, मुला-बाळांचे भविष्य डोळ्यांसमोर उभे राहते. रोशनी समोर देखील तिच्या वैवाहिक आयुष्याच्या सुरुवातीलाच आपल्या पतीला गमावण्याची वेळ आली. त्यामुळे तिच्यासमोर लहान मुलींच्या संगोपणाचा प्रश्न उभा राहिला. याच कारणाने पतीच्या जाण्याच्या विरहात आणि मुलींच्या भविष्याबाबत काळजीने तिने मुलीसह आपले जीवन संपवले. अशी चर्चा नागरिकांमध्ये होती.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here