द पॉईंट नाऊ ब्युरो : भारतात बिहार राज्यामध्ये पेट्रोलियमचा साठा सापडल्याचे सांगण्यात येत आहे. बिहारच्या समस्तीपुर जिल्ह्यात 308 किमी आणि बक्सरच्या 52.13 चौरस क्षेत्रामध्ये पेट्रोलियम उत्पादनांचे साठे सापडल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बिहारच्या जमुई जिल्ह्यात याआधी देशातील सर्वात मोठा सोन्याचा साठा सापडल्याचे समोर आले होते. जमुई जिल्ह्याच्या भूगर्भात देशातील सर्वात जास्त म्हणजे 22 कोटी टनहुन अधिक सोने आणि 37 टनाहुन अधिक अन्य मौल्यवान खनिजांचा साठा सापडला होता. आणि आता समस्तीपुर व बक्सर जिल्ह्यात पेट्रोलियम उत्पादनांचा साठा सापडला असल्याचे संकेत मिळाले आहेत.
दरम्यान आता हा साठा शोधण्यासाठी बिहार सरकारने ONGC ला मान्यता दिली आहे. तर गंगेच्या खोऱ्यात देखील पेट्रोलियम साठ्यांचा अंदाज वर्तवला आहे. आता ONGC या पेट्रोलियम साठ्यांचा कसून शोध घेणार आहे. आणि हे पेट्रोलियम साठे निश्चित झाल्यास, देशाला नक्कीच त्याचा मोठा फायदा होणार आहे. आता अत्याधुनिक साधनांच्या मदतीने या पेट्रोलियमचा साठा शोधण्याची मोहीम राबवली जाणार आहे. आणि हा साठा असल्याचे निश्चित झाल्यास, बिहारचे नशीब पालटेल असे गृहराज्यमंत्री नित्यानंद रॉय यांनी म्हटले आहे.
जगभरात इंधनाचे दर आसमंत गाठत आहेत. त्यात रशिया-युक्रेन युद्धाने इंधनाचे दर वाढण्यास मदतच केली. त्यामुळे याप्रकारे साठे सापडणे हे नक्कीच देशासाठी दिलसायक आहे. असे म्हटले जात आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम