द पॉईंट नाऊ: अनेक दिवसापासून बहुचर्चित असलेल्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. सर्वांच्या नजरा महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अर्थात बारावीच्या निकालाकडे लागल्या होत्या. महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल उद्या 8 जून रोजी जाहीर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाइन घेण्यात आल्या असून . गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नाहीत. मात्र यंदा कोरोनाचा कहर असल्याने 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑफलाइन घेण्यात आल्या. आता विद्यार्थी आणि पालक निकालाची वाट पाहत होते तो क्षण अंतिम टप्प्यात आला आहे.
10वी आणि 12वीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या
दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म भरला आहे तर, यामध्ये ८ लाख ८९ हजार ५८४ विद्यार्थी आणि ७ लाख ४९ हजार ४८७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. बारावी बोर्डाची परीक्षा ४ मार्चपासून सुरू होऊन ७ एप्रिलला संपली. राज्यातील १४ लाख ८५ हजार ८२६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली आहे.
10 वी आणि 12 वी बोर्डाच्या परीक्षांचे निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात जाहीर केले जातात. बोर्डाच्या परीक्षा सुरू होताच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात. मात्र, यंदा दहावी आणि बारावीचे सहा ते सात पेपर असतानाही विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासण्यासाठी घेतला नव्हता.
यंदा शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकल्याने दहावी आणि बारावीचे निकाल उशिरा जाहीर होणार का ? असा प्रश्नही उपस्थित होत होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक चिंतेत होते. मात्र आता उद्या निकाल लागणार असल्याने विद्यार्थी आणि पालकांची चिंता मिटली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल कोणत्या तारखेला जाहीर होणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. त्याचप्रमाणे देशातील इतर राज्यांतील दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्य मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला असला तरी दहावीचा निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. इतर राज्यांतील दहावी आणि बारावीचे निकाल बाकी आहेत.
बोर्डाच्या संकेत स्थळावर निकाल बघता येणार आहे….
mahresult.nic.in
mahahsscboard.in
hscresult.mkcl.org
Thepointnow.in
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम
Ganesh govardhane
Sandip
Tyigwj