मालेगाव – कुत्ता गोळीचे व्यसन पाय पसरतेय; गोळीच्या वादातून तरुणाला मारहाण करून पुलाखाली फेकले

0
37

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (मालेगाव) : मालेगाव येथे तरुणाई मोठ्या प्रमाणावर कुत्ता गोळीच्या नशेच्या आहारी गेल्याचे मागे दिसून आले होते. आता या कुत्ता गोळीच्याच वादातून एका तरुणाला मारहाण करून पुलाखाली फेकून दिल्याची घटना समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मालेगावमध्ये जमीर अहमद अब्दुल जब्बार या तरुणाला काही अज्ञात लोकांनी मारहाण करून जखमी अवस्थेत पुलाखाली फेकून दिल्याचे समोर आले आहे. जमील हा नवापुरा भागातील रहिवासी आहे. त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, पुढील उपचारार्थ त्याला धुळे येथे दाखल करण्यात आले आहे. ही मारहाण कुत्ता गोळीच्या कारणातुन झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

आजची तरुणाई मोठ्या प्रमाणावर नशेच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे. आधी व्हाईटनर, गांजा अशा वेगवेगळ्या नशेच्या आहारी तरुणाई गेली. आणि आता या कुत्ता गोळी नामक नव्या नशेचे लोण तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर पसरू लागल्याचे दिसून येत आहे. नशेच्या आहारी जाऊन तरुणाई उध्वस्त होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here