शिक्षक दिनाच्या दिवशी रोटरी क्लब देवळाच्या वतीने दोनशे झाडांची लागवड

0
54
देवळा रोटरी क्लबच्या वतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात वृक्षारोपण करताना क्लबचे सदस्य. (छाया - सोमनाथ जगताप )

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; शिक्षक दिनाचे औचित्य साधून येथील रोटरी क्लबच्या वतीने शासकीय आयटीआयच्या आवारात खडकाळ माळरान जागेवर दोनशे खड्ड्यांमध्ये वड, पिंपळ, निंब ,शिसव,आवळा आदी विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवाराला संरक्षण भिंत असल्याने या ठिकाणी मोकाट जनावरांचा झाडांना इजा पोहचवु शकणार नाहीत व कुठलेही नुकसान होणार नसल्याने रोटरी क्लबच्या वतीने या ठिकाणी या वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आल्याचे रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील देवरे यांनी सांगितले. येथील कांदा व्यापारी अमोल आहेर यांनी खड्डे खोदण्यासाठी जेसीपी उपलब्ध करून दिले होते.

यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील देवरे ,माजी उपप्रांतपाल डॉ विश्राम निकम ,डॉ वसंत आहेर ,माजी अध्यक्ष कौतिक पवार ,सतीश बच्छाव, अरुण पवार ,सतिष ठाकरे, सेक्रेटरी खंडु मोरे , जितेंद्र कापडने, अरुण डी पवार, प्रितेश ठक्कर, संदीप पगार, सुनील आहेर, संजय पाटील ,संजीव आहेर, विलास सोनजे ,माणिक सोनजे, दिपक गोसावी, रोशन आलीटकर ,राकेश शिंदे, दिनेश देवरे ,दिनेश सोनार, वैभव पवार ,आदेश ठाकरे, कैलास बागुल, अक्षय निकम, वंदना भामरे ,रोटरॕक क्लबचे सदस्य रितेश निकम ,जय बच्छाव, मुकुंद बागुल यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

देवळा रोटरी क्लबच्या वतीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात वृक्षारोपण करताना क्लबचे सदस्य. (छाया – सोमनाथ जगताप )

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here