‘मान्सून रेंगाळलेलाच’ ; पूर्व-मोसमी पावसाची मात्र शक्यता वाढली

0
14

नाशिक : दोन दिवसानंतर दि. ८-९ जून (बुधवार-गुरुवार ) पासुन कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात विशेषतः सातारा सांगली कोल्हापूर  सोलापूर उस्मानाबाद लातूर जिल्ह्यात मध्यम अवकाळी पूर्व मोसमी पावसाची शक्यता जाणवते. रेंगाळलेल्या मोसमी (मान्सून )पावसाच्या प्रगतीसाठी ह्या पावसाचा उपयोग होवू शकतो असा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.

मोसमी (मान्सून )पाऊस दक्षिण कर्नाटकात आहे त्याच ठिकाणी कारवार चिकमंगलळूर बंगळूर धर्मापुरी दरम्यानच अजुन रेंगाळला असुन वातावरणीय बळकटी मिळाल्यासचं तो झेपावू शकतो असे वाटते.

नाशिक जिल्ह्यात १२ जून दरम्यान हलक्या पावसाची सुरवात होवु शकते असे खुळे यांनी सांगीतले. मात्र त्यात दमदार वाढ होण्यास वाटच पहावी लागेल असेही म्हटले.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here