खर्डे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वार्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर

1
22

देवळा ; (सोमनाथ जगताप )

खर्डे ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वार्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली .

देवळा तालुक्यातील माहे जानेवारी 2021 ते डिसेबर -2022 मध्ये मुदत संपणा – या एकुण 26 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून , सदर कार्यक्रमानुसार सोमवारी ( दि .6) रोजी खर्डे येथे विशेष ग्रामसभा बोलावुन प्राधिकृत अधिकारी एन एस पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढण्यात आली .त्यांना ग्रामविकास अधिकारी योगेश पगार यांनी सहाय्य केले

. वार्ड निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे

 ,वार्ड क्रमांक १ -अनु . जाती सर्वसाधारण , अनु . जमाती सर्वसाधारण , सर्व साधारण महिला राखीव  वार्ड क्रमांक २- अनु . जमाती सर्वसाधारण , सर्वसाधारण स्री राखीव ,

वार्ड क्रमांक ३ – अनु . जमाती स्री , सर्वसाधारण ,  वार्ड क्रमांक ४– अनु . जमाती स्री २ , सर्वसाधारण १, वार्ड क्रमांक ५ – अनु . जमाती स्री ,अनु . जमाती सर्वसाधारण , सर्वसाधारण स्री याप्रमाणे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली .

यावेळी सर्व पक्षीय पदाधीकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .दरम्यान ,खर्डे ग्रामपंचायतीची जुनी वार्ड रचना बदलून गुगल मॅप द्वारे नवीन प्रारूप वार्ड रचना तयार करण्यात आली असून ,त्या आधारावर आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे . आता प्रारूप मतदार यादीची इच्छुक उमेदवारांना प्रतीक्षा लागून असून , या नंतर खऱ्या अर्थाने राजकीय घडामोडिंना वेग येणार आहे . खर्डे विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच चुरशीची झाली . यावरून ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक देखील अत्यन्त चुरशीची होणार असल्याचे बोलले जात आहे . यामुळे आतापासूनच राजकीय तर्क वितर्क बांधण्यास सुरुवात झाली आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

  1. चांगल्या प्रकारे न्यूज टाकल्याबद्दल धन्यवाद तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारचे न्यूज टाकतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here