देवळा : पर्यावरण दिनाच्या औचित्य साधत देवळा येथील पर्यारणप्रेमींनी मुंजोबा पार समोर गेल्या वर्षी वृक्षलागवड केली होती. त्या वृक्षाचे संगोपन करत वर्षभर काळजी घेत वर्षपूर्ती निमित्ताने वृक्षांचा प्रथम वाढदिवस साजरा करण्यात आला.
देवळा महाविद्यायातर्फे गेल्या काही वर्षापसून वृक्ष लागवडीवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे. महाविद्यालयाच्या रासेयोजनेचे विद्यार्थी सक्रिय होत पर्यावरण पूरक कार्यक्रम राबवत आहेत.
वृक्षाचा वाढदिवस साजरा करताना उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, रासेयो जिल्हा समन्वयक डॉ. डी. के आहेर, नगरसेवक दिलीप आहेर, उपप्राचार्य बी. के. रौंदळ, प्रा. रवींद्र शिरसाट, गाळेधारक नाना हिरे इ. पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम