आराईत उद्या शिव व्याख्याते उध्दव शेरे पाटिल यांचे व्याख्यान

0
42

स्वप्निल अहिरे प्रतिनिधी – धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार व माजी केंद्रिय संरक्षण मंत्री डाॅ. सुभाष बाबा भामरेसाहेब तसेच बागलाण तालुक्याचे लाडके आमदार दिलीप बोरसे व इतर प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत सभास्वरूपी ग्रामभेट होणार असून तेथे ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे व या सभेबरोबरच शिवव्याख्याते शिवभक्त ऊध्दव शेरे पाटील रा.देऊळगांव सिंधखेडराजा जि.बुलढाणा यांचे शिवचरित्रावर शिवव्याख्यान होणार आहे. ऐतिहासिक विचारवंतांचे विचार ऐकण्यासाठी गावातील व परिसरातील जास्तीत जास्त जनतेने हे व्याख्यान ऐकण्यास हजर रहावे असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

छत्रपती शिवरायांच्या कृपेने आज हा परमभाग्याचा योग जुळून आलेला असल्याने ह्या संधीचा लाभ घेऊन शिवकालिन इतिहासात छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराजे व स्वराज्यासाठी बलिदान दिलेल्या मावळ्यांनी आपल्या हिंदू धर्म रक्षणासाठी स्वतःच्या संसाराला पाणी सोडून आपल्यासाठी काय काय केले तसेच भविष्यात आपण आपला देश व धर्म रक्षणासाठी, आपली संस्कृतीची कशी जोपासना करावी हे विचार ऐकण्यासाठी सर्व माताभगिनी, शिवकन्या, जेष्ठ नागरीक, तरुण युवक, शिवभक्त या सर्वांनी दुपारी ३:०० वाजता ग्रामपंचायत आवारात हजर रहावे असे आवाहन सरपंच, उपसरपंच,सर्व सन्माननीय सदस्य व ग्रामस्थ आराई यांनी केले आहे


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here