महाराष्ट्रात अपघातांची मालिका सुरूच; ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात पुन्हा चौघांचा मृत्यू

0
9

द पॉईंट नाऊ ब्युरो : महाराष्ट्रात अपघातांची मालिका सुरूच आहे. गेल्या दोन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी अपघातात 10 हुन अधिक जणांना प्राण गमवावे लागले. आता नांदेडमध्ये ट्रक आणि कारच्या जोरदार धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

देगलूरकडे जाणारी स्विफ्ट कार आणि देगलूरकडून येणारा ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. शंकरनगरच्या कुचेली फाट्याजवळ झालेल्या या अपघातात कारमधील शंकर जाधव, महानंदा जाधव, कल्पना शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. तर धनंजय शिंदे यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तर स्वाती शिंदे या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील दोन दिवसात नाशिक, बीड या ठिकाणी अपघात होऊन दहाहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आणि आता नांदेडमध्ये झालेल्या या अपघातात पुन्हा चार जणांना आपला जीव गमवावा लागला. यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, नांदेडमध्ये झालेला हा अपघात नेमका कोणाच्या चुकीमुळे याचा पोलीस तपास करत आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here