नाशिकमध्ये कांदा परिषद, तब्बल 39 वर्षानंतर कांदा उत्पादक एकत्र येणार

0
13

नाशिक: नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात 1982 नंतर दुस-यांदा कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शरद जोशी यांनी निफाड तालुक्यातील रुई या गावात 1982 साली पहिली कांदा परिषद आयोजित केली होती. त्यानंतर येत्या 5 जूनला रुईत कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

सध्या कांद्याचे दर हे 6 रुपये ते 14 रुपयापर्यंत आहेत. त्यामुळे मिळणाऱ्या दरातून उत्पादन खर्च निघत नसल्याने कांदा उत्पादक अडचणीत आहे. त्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

रयत क्रांती संघटना करणार नेतृत्व

निफाड तालुका हे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे केंद्र म्हणून ओळखले जाते. निफाड तालुक्यातील रुई या गावात या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सण 1982 ला याच गावात कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे शरद जोशी यांनी 1982 साली या गावात पहिली कांदा परिषद घेतली होती. यावेळी देखील शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहचावा, कांद्याला अनुदान मिळावे, हमीभाव मिळावा आदी मागण्यासंदर्भात या परिषदेत विचार मंथन करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा त्याच रुई गावात रयत क्रांती संघटनेच्या वतीने येत्या 5 जुन रोजी कांदा परिषद आयोजित करण्यात आली आहे.

या आहेत प्रमुख मागण्या

राज्यात गेल्या काही दिवसापासून कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरत आहेत. कांद्याला अनुदान मिळावे, हमीभाव मिळावा, नाफेड कडून खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याला दर वाढवून मिळावा या प्रमुख मागण्यासाठी कांदा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कांदा परिषदे प्रसंगी राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती राहणार असून यामध्ये रयत क्रांती संघेटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांच्यासह भाजप नेते प्रवीण दरेकर, किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर देखील उपस्थित राहणार आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here