पुन्हा एका सामूहिक बलात्काराच्या घटनेने खळबळ; आरोपींमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा समावेश

0
29

द पॉईंट नाऊ ब्युरो : पुन्हा एकदा देशाला हादरवणारी घटना घडली आहे. तेलंगणा राज्याच्या हैदराबाद येथे सामूहिक बलात्काराची घडल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एका 17 वर्षीय मुलीवर 5 जणांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. यातील 3 आरोपी हे अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. ही मुलगी एका पबमध्ये पार्टीसाठी गेली होती. या दरम्यान तिच्यावर पाच मुलांनी कार मध्ये सामूहिक बलात्कार केला. या मुलांसोबत मुलीची मैत्री होती. त्यामुळे पार्टी मधून बाहेर पडल्यावर या मुलांनी तिला घरी सोडतो म्हणून कार मध्ये बसवले. नंतर त्यांनी या पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार करून मारहाण केली. ही महिला गेल्या शनिवारी घडली होती. मात्र हे प्रकरण आत्ता समोर आल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान ही पीडित मुलगी घरी गेल्यावर तिच्या पालकांनी तिच्या अंगावर झालेल्या जखमांबाबत विचारणा केली असता, घडलेला धक्कादायक प्रकार कथन केला. या घटनेत एका आमदाराच्या मुलाचेही नाव समोर येत आहे. मात्र तो या घटनेत सहभागी होता का, याबाबत पोलिसांना साशंकता आहे. या घटनेतील इतर मुलेही राजकीयदृष्ट्या जोडलेल्या कुटुंबांशी संबंधित असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

देशात बलात्काराच्या घटनांमधील वाढ ही चिंता वाढवणारी आहे. वासनेच्या आहारी जाऊन केली जाणारी ही कृत्ये एकामागे एक समोर येत आहेत. त्यात बऱ्याच घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश समोर आल्याने, चिंता वाढली आहे. आता हैदराबाद येथील या घटनेत पुढे काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here