गिरणा आमची आई तिचे वस्त्रहरण कदापी होऊ देणार नाही ; विठेवाडीत ग्रामसभेत नागरिकांचा एकमुखी निर्णय

0
12

देवळा ; गिरणा नदी पात्रातील वाळू लिलावा बाबत विठेवाडी ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा (दि२) रोजी उपविभागीय अधिकारी राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली . यावेळी गिरणा नदी पात्रातून विठेवाडी गांव व वसाका कार्यस्थळावरील अवैद्य वाळू तस्करी संदर्भात प्रखर विरोध करत कुठल्याही परिस्थितीत वाळूचा निलाव होऊ दीला जाणार नाही असा एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला .

देवळा विठेवाडी येथे वाळू लिलावा संदर्भात आयोजित विशेष ग्रामसभेत मार्गदर्शन करतांना उपविभागीय अधिकारी राजेश देशमुख व उपस्थित ग्रामस्थ आदी छाया सोमनाथ जगताप

या विशेष ग्रामसभेत प्रांत अधिकारी देशमुख यांनी शासनाची भूमिका मांडली . राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते पंडितराव निकम यांनी गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याने त्याला शासकीय यंत्रणाच जबाबदार आहे , राजरोसपणे अवैध वाळू उपसा होत असताना महसूल विभाग हा *वराती मागे घोडं नाचवत,चोर सोडून संन्यासाला फाशी देण्याची कार्यवाही करीत आहे . याप्रकारे महसूल यंत्रणेवर ताशोरे ओढले . विशेष ग्रामसभेत वाळू उपसा संदर्भात प्रस्तावित टेंडर प्रक्रियेला एकमुखी विरोध दर्शविला व तसा ठराव मंजूर करण्यात आला .यावेळी गावातील जेष्ठ नागरिक पि डी निकम यांनी वाळू विरोधात ग्राम सभेत ठराव मांडला व त्याला गावाच्या वतीने इंजिनिअर कुबेर जाधव यांनी अनुमोदन दिले, याप्रसंगी गावातील शेकडो तरुण व जेष्ठ नागरिक हजर होते .

ग्रामसेभेस विकास सोसायटीचे अध्यक्ष पप्पू निकम, विलास निकम , पंडितराव निकम , महेंद्र आहेर ,शशी निकम, तानाजी निकम ,दीपक निकम, बाळासाहेब सोनवणे,धना निकम , काकाजी निकम ,राजु निकम, प्रविण निकम ,ग्रामसेवक सोनवणे , मंडल अधिकारी राम परदेशी, तलाठी नितीन धोंडगे , जिभाउ गरुड आदीसह नागरिक उपस्थित होते .

गिरणा नदीला आम्ही आई समान मानतो ,यामुळे आम्ही तिचे वस्त्रहरण होऊ देणार नाही . आमचा जोपर्यंत श्वास आहे .तोपर्यंत तरी गिरणा नदीपात्रातील वाळू लिलाल होऊ देणार नाही . या नदीपात्रातील अवैध वाळू उपशामूळे सटाणा सह,देवळा ,विठेवाडी ,लोहोणेर ,ठेंगोडा गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या योजना ओस पडू लागल्या आहेत . उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते . यामुळे आजच्या विशेष ग्रामसभेत वाळू लिलाव प्रक्रियेला सर्वानुमते विरोध दर्शवला . तसा ठराव सहमत करण्यात आला .
– पंडितराव निकम , ग्रामस्थ विठेवाडी


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here