द पॉईंट नाऊ विशेष : सिंह हा मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी आहे. त्याच्यानंतर वाघ, बिबट्या आणि चित्त्याचा नंबर लागतो. जगात दोन प्रकारचे सिंह आढळतात, आफ्रिकेतील साव्हाना गवताळ प्रदेशात तो प्रामुख्याने सापडतो आणि तो तेथील सर्वोच्च शिकारी प्राणी आहे.
जगात आशियाई सिंह फक्त भारतातील गुजरात राज्यातील गीर अभयारण्यामध्ये सापडतो. सिंहाला पाण्यात राहणे कधीच आवडत नाही आणि तो पाण्यात जाने टाळतोच. कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद हालचालींवर त्यांचे बारीक लक्ष असते. भारतात त्याची मोठ्या प्रमाणात शिकार झाल्याने ते संपल्यातच जमा होते. यामुळे १९६० साली वाघाला नवीन राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.
त्याला जंगलाचा राजा म्हणतात. आता तुम्हाला मी जे काही सांगेल त्याच्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. सिंह हा स्वतः कधीही शिकार करत नाही. सिंह फक्त सिंहिणीने केलेल्या शिकारीवर आयता ताव मारतो. सिंह स्वतः शिकार करतच नाही. सिंह दुसऱ्या शिकारी प्राण्याने केलेली शिकार चोरतो. त्याच्या आहारातील बराच भाग हा चोरीचाच असतो. सिंहाला जंगलाचा राजा का म्हणतात आता हे आता प्रकाशात आणलाच पाहिजे.
सिंहाचे सरासरी वजन हे २२०-२५० किलोग्रॅम इतके असते. त्याचा जबडा हा इतर शिकारी प्राण्यांपेक्षा मोठा असतो. जबड्यात केनायान प्रकारचे दात असतात. कोणत्याही प्राण्याच्या शरीरावरील मांस फाडू शकते. एका प्रौढ सिंहाला दिवसा सरासरी २० किलोग्रॅम मांस लागते. सिंह हा अन्नसाखळीत सर्वोच्च स्थानी असतो.सिंह हा शुद्ध मांसाहारी प्राणी आहे. सिंह हा छोट्या उंदारापासून ते काळवीट, ग्रीझेल, सांबर, नीलगाय आणि जंगली म्हशींची शिकार करतो. या गवत खाणाऱ्या प्राण्यांचे प्रमाण संतुलित ठेवतो. यामुळे निसर्गाचे संतुलन बनून राहते. सिंहांचे नखे हि ५-६ सेमी इतके लांब असून ती लपून ठेवतात. या नखान्द्वारे ते शिकारीवर कमालीची पकड मिळवतात.
प्रश्न हा कि सिंह शिकार का करत नाही. याचे उत्तर म्हणजे त्याचे वजन आणि त्याची आयाळ. सिंहाला त्याच्या आयालीमुळे कमालीचे सौंदर्य प्राप्त होते पण यामुळेच त्याची गतिशीलता आणि चपळता कमी होते. आयाळीमुळे भक्षाचा गळा आवळणे अवघड होते. त्यामुळे सिंह शिकार करणे टाळतो. सिहीनीचे वजन हे सरासरी ११५-१२५ किलोग्रॅम असते आणि त्यांच्यात कमालीची चपळता असते. यामुळे सिंहिणी शिकार करते.
सिंह हा कितीही आक्रमक परभक्षी असला तरी तो एक कुटुंबवत्सल प्राणी आहे. सिंह हा समूह करून राहतो. त्याच्या समूहात प्रमुख नर सिंह आणि सिंहिणी त्यांची पिल्ले म्हणजे छावे असतात. हि छावे २ ते ३ वर्षाची होताच त्यांना हाकलून दिले जाते. प्रमुख सिंह सिंहिणीसोबत प्रणय करून त्यांचा वंश टिकवण्याचा प्रयत्न करतात. काही वेळा समूहातील तरुण सिंह प्रमुख सिंहांचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रमुख सिंहांना आवाहन देतात. आणि यात जो सिंह हारतो त्याला समूह सोडावा लागतो. किंवा हरलेला सिंह मारलाही जातो. दुसरे भटके सिंहही दुसऱ्या समूहाच्या सिंहासोबत हेच करतात. आणि हे नवीन सिंह हरलेल्या सिंहाच्या छाव्यांना मारून टाकतात किंवा खाऊन जातात. तरच या सिंहिणी नवीन सिंहानसोबत प्रणयासाठी तयार होतात. कोणत्याही समूहाचे प्रमुख त्यांच्या समूहाच्या सिंहिणी आणि त्याच्या छाव्यांचे रक्षण करतात. यासाठी ते स्वतःचा जीवही पणाला लावतात. इतक्या रुबाबदार ताकदवान प्राण्याचा अधिवास हा मानवामुळे संकटात आला आहे.
-गिरीश सावळा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम