द पॉईंट नाऊ ब्युरो : नागपूर मध्ये एक अतिशय धक्कादायक बाब समोर आली आहे. एका नराधमाने 7 मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
मयूर मोडक नावाचा हा नराधम लहानग्या मुलांना चिंचा आणि आंब्याचे आमिष दाखवून महाराज बागेत एका पडक्या घरात नेत होता. आणि तेथे जाऊन मुलांवर अत्याचार करत होता. एका लहान मुलाच्या पोटात अचानक दुखू लागल्याने, त्याला पालकांनी विचारल्यावर त्याने सारा प्रकार सांगितला. यामुळे हा सारा प्रकार उघड झाला.
लहान मुलांना चॉकलेट, बिस्कीट, आंबे, चिंचा अशा गोष्टी खूप आवडतात. आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन मयूर मोडक या नराधमाने लहानग्या मुलांसोबत हे संतापजनक कृत्य केले. दरम्यान, या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. समोर आलेल्या या प्रकाराने नागपूर मध्ये खळबळ उडाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम