मंकीपॉक्सबाबत अलर्ट जारी! केंद्र सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली

1
4

नवी दिल्ली: कोरोना विषाणूच्या संसर्गादरम्यान, मंकीपॉक्स देखील जगातील अनेक देशांमध्ये पसरत आहे. या आजाराने मोठ्या प्रमाणात लोक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, भारतातील मंकीपॉक्सचा धोका लक्षात घेता आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी (दि. 31) मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मंकीपॉक्सच्या रुग्णांना 21 दिवस देखरेखेखाली ठेवले जाईल.

मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या 21 दिवसांची सुरुवात ही संबंधित व्यक्ती ज्या दिवसापासून एखाद्या रुग्णाच्या किंवा त्याच्या कोणत्याही वस्तूच्या संपर्कात आल्यास त्या दिवसापासून त्याच्यावर देखरेख ठेवली जाईल. मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की संक्रमित व्यक्तीवर किमान दररोज लक्ष ठेवले पाहिजे. आतापर्यंत भारतात मंकीपॉक्सचे एकही प्रकरण नाही, असे म्हटले आहे. परंतु संशयित रुग्णाची ओळख पटल्यानंतर त्याचे नमुने पुण्यातील नॅशनल वायरोलॉजी इंस्टीट्यूटकडे तपासणीसाठी पाठवले जातील. हा नमुना इंटीग्रेटेड डिसीज सर्विलांस प्रोग्राम नेटवर्क अंतर्गत पाठविला जाईल.

24 देशांमध्ये पसरलाय मंकीपॉक्स

याआधी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने सांगितले होते की, मंकीपॉक्सचा धोका लक्षात घेता भारत प्रत्येक परिस्थितीशी लढण्यास सज्ज आहे. लहान मुलांना या आजाराचा सर्वाधिक धोका असल्याची माहिती त्यांनी दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मंकीपॉक्स हा आजार सध्या जगभर पसरत आहे. आतापर्यंत 24 देशांमध्ये त्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या देशांमध्ये नोंदलेल्या प्रकरणांची संख्या 400 पेक्षा जास्त झाली आहे. त्याच वेळी, जागतिक आरोग्य संघटनेने इशारा दिला आहे की येत्या काही दिवसांत त्याचे रुग्ण वाढू शकतात.

ब्रिटनमध्ये 21 दिवस क्वारंटाईन

ब्रिटनमध्येही मंकीपॉक्सची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. या आठवड्यात इंग्लंडमध्ये मंकीपॉक्सची 71 प्रकरणे समोर आली आहेत. यासह, ब्रिटनमध्ये आढळलेल्या मंकीपॉक्सच्या एकूण रुग्णांची संख्या 179 वर पोहोचली आहे. ब्रिटनमध्ये सरकारने अशी व्यवस्था केली आहे की ज्याला मंकीपॉक्सची लागण झाली आहे त्याला 21 दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवले जाईल.

मंकीपॉक्समुळे 9 जणांचा मृत्यू

या वर्षी काँगोमध्ये मंकीपॉक्समुळे 9 जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारपर्यंत, काँगोमध्ये मंकीपॉक्सच्या 465 प्रकरणांची पुष्टी झाली आहे. त्याच वेळी, नायजेरियामध्ये मंकीपॉक्समुळे पहिला मृत्यू नोंदवला गेला आहे. यासोबतच, पाकिस्तान सरकारने त्या अहवालांना चुकीचे म्हटले आहे, ज्यात दावा केला होता की देशात मांकीपॉक्सची प्रकरणे आढळून आली आहेत.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

  1. हे सर्व मुर्खा बनवीण्याचे षड्यंत्र रचले गेले आहेत. जसा कोरोना काल्पनिक कथा रचली होती तसाच हा काल्पनिक रोगाची रचना औषधे कंपन्यांकडून लोकांना विनाकारण लसी टोचुन सरकारकडून पैसे उकळण्यासाठी रचलेला ठरवुन केलेला हा सर्व प्रकार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here