मुख्याध्यापक डी ई आहेर यांनी केलेले कार्य आदर्शवत – प्रा. आहेर

0
30
देवळा / मुख्याध्यापक डी इ आहेर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमा प्रसंगी बोलतांना प्राचार्य हितेंद्र आहेर ,समवेत सचिव गंगाधर मामा शिरसाठ , डॉ मालती आहेर आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा ; ज्ञानदानाच्या सेवेतून निवृत्त होत असताना मुख्याध्यापक डी ई आहेर यांनी केलेले कार्य आदर्शवत असून मुख्याध्यापक म्हणून केलेली संस्थेची सेवा ही प्रशासकीय सेवा म्हणून आदर्शवत ठरेल असे प्रतिपादन देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन प्राचार्य हितेंद्र आहेर यांनी केले.

देवळा / मुख्याध्यापक डी इ आहेर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमा प्रसंगी बोलतांना प्राचार्य हितेंद्र आहेर ,समवेत सचिव गंगाधर मामा शिरसाठ , डॉ मालती आहेर आदी (छाया – सोमनाथ जगताप )

देवळा येथील श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक दिलीप एकनाथ आहेर हे आपल्या प्रदीर्घ सेवेतून( ३१)मे रोजी सेवानिवृत्त झाले .संस्थेच्या वतीने आयोजित निरोप समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. श्री आहेर यांनी संस्थेच्या डांगसौंदाणे ,कनाशी , नांदगाव तसेच देवळा येथे शिक्षक,पर्यवेक्षक ,मुख्याध्यापक या पदांवर सेवा बजावली.

त्यांच्या कार्यकाळात विविध गुणवत्ताविकासाचे उपक्रम राबवत शाळा आयएसओ मानांकित झाली. संस्थेच्या गुणवत्ता विकास कार्यक्रमातसुद्धा त्यांनी मोलाचा सहभाग नोंदवला.यावेळी संस्थेचे सचिव गंगाधर मामा शिरसाठ , उपप्राचार्य डॉ मालती आहेर, पांडुरंग जाधव,माजी मुख्याध्यापक अशोक मोरे ,प्रा.बी के रौन्दळ , सहकारी शिक्षक एस टी पाटील,वृक्षमित्र सुनिल आहेर ,शांताराम पवार आदीं मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले .श्री डी ई आहेर यांनी विद्यालयाला बहुउद्देशीय फोटो फ्रेम भेट दिली आणि यापुढेही आवश्यकतेनुसार सेवेस तत्पर असेन असे सांगितले.

याप्रसंगी संस्था आणि विद्यालय परिवाराच्या वतीने त्यांना सपत्नीक स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास बाळासाहेब आहेर,व त्यांचे आप्तेष्ट ,विद्यालय व संस्थेच्या इतर शाखांचे मुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .सूत्रसंचालन डी वाय भदाणे यांनी केले तर आभार एस टी पाटील यांनी मानले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here