साखर कामगारांच्या पगार वाढीने साखर कामगार समाधानी – राजेंद्र तावरे

0
7

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; अत्यंत खडतर प्रवासातून राज्यातील साखर कामगारांना 12 टक्के पगारवाढ करून साखर कामगार नेत्यांनी एक ऐतिहासिक निर्णय शासन व आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने करून घेतलेला आहे .

त्यामुळे राज्यातील साखर कामगारांकडून महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, शंकरराव भोसले व महासंघाचे वाईकर व इतर संघटनाचे नेते व यासाठी मदत केलेल्या तमाम राज्यातील साखर कामगारांच्या वतीने या सर्व नेत्यांचे तसेच साखर कामगारांचे तारणहार आदरणीय पवार साहेब यांचे सर्वच साखर कामगारांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे .

ही पगार वाढ अत्यंत चांगली झाली असल्याची भावना सर्व कामगारांच्या कडून व्यक्त होत आहे. त्यामुळे आज सर्व साखर कामगार समाधानी आहेत.

राज्यातील साखर कामगारांच्या वेतन वाढीसबधी राज्य शासनाच्या कामगार विभागामार्फत साखर कारखाना व्यवस्थापन प्रतिनिधी, साखर कारखाना कामगार प्रतिनिधी आणि शासन प्रतिनिधीं याची त्रिपक्षीय समिती गठीत करण्यात आली होती. प्रचलित वेतन कराराची मुदत दि 01/04/2019 ला संपुष्टात आली होती. नवीन करार पुढील 5 वर्षांकरिता करण्या करीता मा.श्री. जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राज्य सहकारी साखर कारखाना सघ यांचे अध्यक्षतेखाली वेतन वाढीसाठी समितीने सकारात्मक चर्चा करून दि 09/09/2021 रोजी आदरणीय श्री शरदचद्रजी पवारसाहेब यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे निर्णय केले आहेत. प्रामुख्याने 12 % वेतन वाढ, महागाई रू.2.70 वरून रू. 2.90 वाढ देण्यात आली.
पुर्वीच्या मध्ये बदल करून 7 ,15 आणि 21 वर्षा ऐवजी , 6,14 आणि 20 वर्ष याप्रमाणे वार्षिक इन्क्रिमेंट देण्याचे सर्वानुमते मान्य करण्यात आले आहे.

सदर करार दि.01//04//2019 पासून होणार असल्याने कारखाने फरकाची रक्‍कम अदा करतील. तथापी त्याचा तपशिल स्थानिक पातळीवर निश्‍चित केला जाईल.

संबंधीत वेतन वाढीबाबत लवकरच कामगार विभागामार्फत यथोचित निर्णय निर्गमित होईल.
या पगारवाढीसाठी मुख्यता महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ तसेच महासंघ यांचे प्रमुख माननीय तात्यासाहेब काळे , शंकरराव भोसले, महासंघाचे प्रमुख वाईकर यांनी विशेष प्रयत्न केले.
या सर्वांचेच साखर कामगार साखर कामगारांकडून सोशल मीडियावर अभिनंदन केले जात आहे.

दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या साखर कामगारांच्या वेतनवाढीचा प्रश्न सामोपचाराने तोडगा काडुन १२% वार्षिक पगार वाढ माण्य करण्यात आली आहे , साखर कामगार संघटना,शाशन, साखर कारखाने ,या तिघां मिळुन झालेल्या त्रिपक्षीय करारा नुसार माण्यता घेण्यात आली , किमान १५%वाढ अपेक्षित होती , दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात २०० कारखाने असून त्यातील निम्मे कारखाने दीवाळखोरीत निघून बंद पडले , बहुतांश कारखाने विक्री झाले, काही भाडेतत्त्वावर घेऊन चालवली जात असल्याने त्या कारखान्या मधील कामगारां साठी या करारामुळे काही ही फायदा होणार नसल्याने , नव्याने वा भाडेपठ्यावर सुरू असलेल्या कारखान्यातील कामगारांना या करारामुळे काही ही लाभ होनार नाही –
कुबेर जाधव , कार्याध्यक्ष वसाका मजदुर युनियन ,वसाका नाशिक


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here