द पॉईंट नाऊ ब्युरो : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या रुपाली चाकणकर यांना 24 तासात ठार मारू अशी धमकी देण्यात आली आहे. मागील काही दिवसांत त्यांना ही अशी तिसऱ्यांदा धमकी देण्यात आली आहे.
रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून अनेकांना चांगलेच धारेवर धरले आहे. महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात चाकणकर या चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहायला मिळतात. त्या अनुषंगाने त्यांनी बऱ्याचश्या गोष्टींमध्ये महिला अत्याचाराविरोधात आवाज उठवतांना, अनेकांवर कारवाईचे आदेश देखील दिले. चाकणकर यांच्या या आक्रमक बाण्याने अनेकांचे चांगलेच धाबे दणाणले. चाकणकर यांच्या या आक्रमक पावित्र्यातून मोठमोठे लोक सुटलेले नाहीत. त्यामुळेच तर त्यांना ही धमकी मिळाली नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.
दरम्यान, त्यांना अज्ञात व्यक्तीने 24 तासात ठार मारू असा इशारा दिला आहे. मात्र धमकीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आता पोलीस यावर काय ऍक्शन घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम