मुंबई प्रतिनिधी : नवी मुंबईत घर घेऊ इच्छणाऱ्यांसाठी एक आनंदाची वार्ता आहे. गणेशोत्सवात सिडको कडून ५००० नवीन घरांची योजना येणार आहे.वाशी, मानसरोवर, जुईनगर इथे ही घरी उपलब्ध होणार आहेत.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनेक घर सिडकोच्या माध्यमातून बांधली जात आहेत. दरम्यान, याच्या पहिल्या टप्प्यातील २३ हजार ५०० घर बांधून तयार झाली आहेत. त्यांची वाटप प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे.
दुसऱ्या टप्प्यामध्ये ६७ हजार घर प्रस्तावित करण्यात येणार आहेत. या घरांचा आराखडा तयार असून कंत्राटदार देखील नेमण्यात आले आहेत. सध्या तयार होत असलेल्या ३५ हजार घरांना महारेरातर्फे मंजुरी मिळाली आहे. गणेशोत्सवाचा मुहूर्त पाहून ५ हजार घरांचा सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम