द पॉईंट नाऊ ब्युरो : उत्तराखंड मध्ये माजी मंत्र्याने आपल्याच नातीच्या विनयभंगाचा आरोप करण्यात आल्याने आत्महत्या केली आहे. हा आरोप या मंत्र्यांच्या सुनेने केला होता. यामुळे या माजी मंत्र्याने आरोप सहन न झाल्याने आत्महत्या करत आपले जीवन संपवले.
माजी मंत्री राजेंद्र बहुगुणा यांच्यावर त्यांच्या सुनेने नातीच्या विनयभंगाचा आरोप केला होता. याप्रकरणी बहुगुणा यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे बहुगुणा यांनी पोलिसांना बोलावून घेत, त्यांच्यासमोर पाण्याच्या टाकीवर चढून स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. बहुगुणा यांनी 2002 मध्ये मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद भूषवले होते.
दरम्यान, पोलिसांद्वारे बहुगुणा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सुनेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बहुगुणा यांना पोलिसांनी टाकीवरून खाली उतरण्यास सांगितले होते. मात्र त्यांनी स्वतःच्या छातीत गोळी झाडून घेतली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम