द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : कोरोना रुग्णसंख्येमध्ये दररोज वाढ होऊ लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी कोरोना रुग्णांच्या संख्येत अशीच वाढ होत गेली तर पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवली आहे.
काही महिन्यांआधी कोरोना रुग्णसंख्येत घट झाली होती, त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम शिथिल करण्यात आले होते. मात्र काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेस मास्क वापरण्याचे आवाहन केले होते.
उद्धव ठाकरेंनंतर मुंबईच्या पालकमंत्र्यांनी यांनी पुन्हा निर्बंध लागू शकत असल्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच ते म्हणाले, कोरोना रुग्णांमध्ये सतत वाढ होत आहे. महाराष्ट्र सरकार सर्व परिस्थितीवर बारकाईने लक्ष देत आहे. जर रुग्ण संख्या १ हजाराचा पल्ला गाठला तर पुन्हा निर्बंध लागू शकतात.
मुंबई बरोबरच महाराष्ट्रातील इतर भागात कोरोना रुग्ण हळूहळू वाढत आहेत. २६ मे रोजी राज्यात ५०० हून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली. तर फक्त मुंबईमध्ये ३०० चा टप्पा गाठला गेला होता. त्यामुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता देखील वर्तवली जात आहे. कोरोनाची चौथी लाट सप्टेंबर महिन्यात येण्याची शक्यता आहे असे बृहन्मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे.
आताच्या आकडेवारी कडे पाहता, राज्याची साप्ताहिक पॉझिटीव्हिटी ही १.५९ टक्के आहे. मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीहून अधिक पॉझिटीव्हिटी आढळते. मुंबईत रुग्णसंख्येत ५२.७९ टक्के वाढ झाली असून ठाण्यात २७.९२ टक्के आहे. तर रायगड आणि पालघर जिल्ह्यात १८.५२ टक्के ६८.७५ टक्के एवढी वाढ झाली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम