द पॉईंट नाऊ ब्युरो : औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरच्या शिवसेना आमदाराच्या त्रासाला कंटाळून एका महिलेने आत्महत्येची परवानगी मागितल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सदर महिलेने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र पाठवले आहे.
मागील काही दिवसांत राजकीय नेत्यांवर एक ना अनेक आरोप होत आहेत. आत्तापर्यंत शांत असलेलं वातावरण आता अचानकपणे बदलू लागले आहे. याच कारणास्तव की काय, बहुतांश जण आता राजकीय नेत्यांविरोधात पुढे येत आहेत.
बऱ्याच नेतेमंडळींवर आत्तापर्यंत बऱ्याच महिलांनी वेगवेगळे आरोप केले आहेत. आणि आता औरंगाबाद (संभाजीनगर) जिल्ह्यातील वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्यावर एका महिलेने मारहाणीचा आरोप केला आहे. जयश्री दिलीपराव बोरणारे असे महिलेचे नाव असून, तिने याबाबत राज्याच्या गृहमंत्र्यांना पत्र पाठवत आत्महत्येची परवानगी मागितली आहे. वैजापूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना देखील याबाबत पत्र पाठवले आहे.
याआधी गावात भाजपच्या शाखा उद्घाटनास का गेली, म्हणून रमेश बोरणारे यांनी मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला होता. आता पुन्हा आमदार बोरणारे यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, जयश्री दिलीपराव बोरणारे या आमदार रमेश बोरणारे यांच्या भाउजई असल्याचे सांगण्यात येत आहे. आता याबाबत गृहमंत्री काय कारवाई करतात किंवा काय आदेश देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम