द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याची दिसून येत आहे. शनिवारी सकाळी प्रति बॅरल १२० डॉलर असे ब्रेंट क्रूड ऑयल जवळ व्यवहार करत होते. कच्च्या तेलाच महागल्यामुळे तेल कंपन्यांनकडून शनिवारी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. आजपर्यंतच्या दरामध्ये कोणताही बदल झाला नाही. दिल्लीमध्ये पेट्रोल ९६.७२ रुपये प्रतिलिटर असे मिळत आहे.
काही दिवसांपूर्वी पाहायला गेले तर केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे पेट्रोल ९.५० रुपयांनी तर डिझेल ७.५० रुपयांनी स्वस्त झाले होते. मात्र, कच्च्या तेलाने पुन्हा कंपन्यांवर दर वाढवण्याकरिता दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.
चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर-
- दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे.
- मुंबईत पेट्रोल १०९.२७ रुपये तर डिझेल ९५.८४ रुपये प्रति लिटर आहे.
- चेन्नईत पेट्रोल १०२.६३ रुपये तर डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे.
- कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये तर डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम