बाप-लेकीच्या नात्याला काळिमा; बापाचे पोटच्या मुलीसोबत संतापजनक कृत्य

0
29

द पॉईंट नाऊ ब्युरो : माणसाची वासनांधता इतकी टोकाला गेली आहे की, तो काहीही पाहेनासा झाला आहे. पुण्यात नात्याला काळिमा फासणारी अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका बापाने आपल्या पोटच्या मुलीवरच बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील हडपसर मध्ये साडे सतरा नळी परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तिच्या नराधम बापानेच बलात्कार केल्याचे समोर आले आहे. सदर पीडित मुलगी ही 14 वर्षांची आहे. पीडित मुलीने याबाबत तक्रार दाखल केली आहे.

बाप हा एका मुलीच्या आयुष्यातील सर्वप्रथम हिरो असतो. बाप असेल तर कसलेच भय नसते. यामुळे एका मुलीच्या आयुष्यात बापाचे मोठे स्थान असते. मात्र या घटनेत एक बापच आपल्या पोटच्या मुलीचा वैरी निघाला. बापाने केलेल्या या संतापजनक कृत्याने बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here