मुंबई प्रतिनिधी : कोरोना बद्दलची सर्वात महत्वाची बातमी. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत राहिली तर नियम पुन्हा लागू करण्यात येतील असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे.
आज राज्यामध्ये कोरोनाचे ५३६ नवे रूग्ण सापडले आहेत दोन दिवसांआधी कोरोना रुग्णसंख्या १०० इतकी होती. परंतु पुन्हा एकदा रूग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. रूग्ण संख्येत अशीच वाढ होत राहिली तर कोरोनाचे निर्बंध पुन्हा लागू शकतात तसेच मास्कसंबंधी नियमही बदलू शकतात, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.
मुंबईत कोरोना रुग्ण संख्येत वाढ
मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस चढ-उतार होताना दिसत आहे. शुक्रवारी मुंबईत ३५२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. दिलासादायक म्हणजे येत्या चोवीस तासात एकही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही, तर २४ तासात २१३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या १७९७ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम