मान्सून संबंधी भडक बातम्या येतात. बिचाऱ्या शेतकऱ्यांच्या सदर बातम्यासंबंधी असलेल्या उत्सुकतेचा फायदा उठवून त्याचं मन विचलित करून त्याला भ्रमित करणाऱ्या मीडिया व इतर तज्ज्ञ म्हणवणाऱ्यांची शर्यत लागली असून शेतकऱ्यांनी याला बळी पडू नये असे आवाहन हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांनी केले आहे.
खुळे पुढे म्हणाले की शेतकऱ्यांनी विचलित व्हायचं नाही. चुकीच्या व गोंधळाच्या बातम्या ऐकून भ्रमनिरास व्हायचं नाही. अशा बातम्यामुळे अप्रत्यक्ष हवामान खातेही बदनाम होत आहे. शेतकऱ्यांना ह. खाते बुलेटिन पुर्ण समजून घेणे जे समजले तेव्हढेच खरं ते योग्य सांगुन वास्तवात नेणेच केंव्हाही चांगले . परंतु असं होत नाही. म्हणून मान्सून संबंधी सध्याच्या वातावरणातील घडामोडीनुसार जे जाणवते ते असे की
१- मान्सून जरी २७ मे च्या आसपास केरळात दाखल झाला तरी केरळ राज्याचा भुभाग व्यापवून पुढे वाटचाल करण्यासही कालावधी लागतो हा विचारही मनी असावा.
२- त्यानंतर अरबी समुद्रातील पश्चिम किनारपट्टी काबीज करण्यासाठी त्याच्या अंगी बळकट ऊर्जा असणे, सह्याद्रीच्या पूर्वेला ( वर्षच्छायेच्या प्रदेशात म्हणजे मध्य महाराष्ट्रात )उष्णतेमुळे उर्धवगामी झोताच्या सांद्रीभवनातून जोराच्या पूर्व मोसमी सरी कोसळणे गरजेचे असते. तरच संपूर्ण दक्षिण भारतातील द्वीपकल्प कव्हर करून मान्सून पुढे झेपावतो व नंतरच मुंबई पर्यंत पोहचतो. ह्यासाठी अरबी समुद्रात एखादी प्रणाली घडून येणे आवश्यक असते.
३- कोकण किनारपट्टी धो -धो धुतल्यानंतर जेंव्हा घाटमाथ्यावरील ठिकाणे म्हणजे उत्तरेकडून सुरवात केल्यास नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर नाशिक घोटी इगतपुरी, नगर जिल्ह्यातील भंडारदरा पुणे जिह्यातील घोडेगाव मावळ मुळशी पुणे भोर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर सातारा कोल्हापुरातील शाहूवाडी बावडा कोल्हापूर राधानगरी इत्यादी ठिकाणी चांगला स्थिरवल्यानंतरच तो उर्वरित महाराष्ट्रात ( पूर्व मराठवाडा व विदर्भ वगळता ) प्रवेश करतो.
४-मराठवाड्यातील पुर्ण लातूर, जालना जिल्हा, पूर्व बीड जिल्हा, औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री सिल्लोड सोयगाव सहित संपूर्ण विदर्भात मात्र पाऊस हा मान्सूनच्या बंगालच्या उपसागराहून येणाऱ्या शाखेतून कोसळतो. पुढे तो छत्तीसगढ मार्गे पूर्व भारतात प्रवेशतो.
५- मान्सून लांबला, रेंगाळला, निर्धारित वेळेपेक्षा उशिरा येणार अश्या बातम्याचे सध्या मीडियात काहूर चालु आहे.
६- भा. ह. खात्याने १३ मे ला सांगितलेल्या बातमीनुसार देशात २०२२ चा मान्सून २७ मे ला अधिक व वजा ४ दिवसाच्या फरकाने म्हणजे उशिरात उशिरा म्हणजे ३१ मे पर्यंत अपेक्षित आहे. मध्य संदर्भचौकटीसाठी २७ मे तारीख विभागाकडून घोषित झाली. तारीख लक्षात ठेवली पण अधिक व वजा ४ दिवसाचा लक्षात घेतला जात नाही.
७- साधारण साडे आठ अक्षवृत्तवर मान्सून पोहोचला कि समाजावं कि मान्सून देशात पोहोचला. आज २७ ला मान्सून आठ अक्षवृत्तच्या दरम्यान पोहचला असुन केरळ पर्यंत पोहोचण्यास केवळ ७०-८० किमी अंतर कापवयाचे आहे.
८- पूर्वमोसमी पाऊस ज्या पद्ध्धतीने महाराष्ट्रात व्हावयास हवा तसा जाणवत नसुन ५ जूनच्या दरम्यान महाराष्ट्राच्या भुभागावर व त्याचदरम्यान मुंबईत व तळ कोकणात होवु शकतो असे वाटते. त्या पाठोपाठ लगेचच मोसमी पाऊस होवु शकतो.
९- असेच वातावरण राहिले तर महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाचा चांगला मोसमी पाऊस मुंबई सह कोकणात ९ जून दरम्यान होवु शकतो असे वाटते. तर १३ ते २३ जून दरम्यान मध्यम स्वरूपाचा मोसमी पाऊस संपूर्ण महाराष्ट्रही काबीज करू शकतो. असे वाटते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम