द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : आपण अनेकदा पाहतो किंवा ऐकतो की नवरा छळतो म्हणून बायको पोलिसात धाव घेते. पण बुलडाणा जिल्ह्यात मात्र पार उलटच प्रकार घडला आहे. पोलीसांकडे जाणे तर सोडाच पतीने थेट बायको विरोधात उपोषण सुरु केले आहे.
नवरा बायकोचे भांडण झाले आणि नवरा थेट बायकोच्या विरोधात उपोषणाला बसला हा प्रकार बुलडाणा जिल्ह्यामधील नांदुरा शहरातील आहे. शहरामधील राजनगरात राहणाऱ्या नवऱ्याने बायकोने घटस्फोट न घेता दुसऱ्या लग्नास उभी राहिली म्हणून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्याकरिता गेले. मात्र, पोलिसांकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने उपोषणाचे अस्त्र त्यांनी बाहेर काढले आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घालत लवकरात लवकर पत्नीवर गुन्हा दाखल करून तिच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पतीने केली आहे. २६ मे पासून नांदुरामधील तहसील कार्यालयासमोर आपला तंबू ठोकुन ते बसले आहेत. त्यामुळे पोलीस आता नेमक काय कारवाई करतात याकडे पतीच लक्ष लागले आहे. आणि असा प्रकार पहिल्यांदाच पाहायला मिळत असल्याने जिल्ह्यात सर्वदूर याच विषयाची चर्चा सुरु आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम