मालेगाव : सद्या लग्नसोहळ्यांचा धूमधडाका सुरु आहे. स्थळ शोध मोहीम एक दिव्य ठरतेय. त्यात आर्थिक – सामाजिक पतच नव्हे, तर रंग, रुप आणि उंचीला विशेष महत्व दिले जाते. एखाद्या पातळीवर तोलमोलात कमी पडले तरी माशी शिंकते. त्यातही उंची कमी असली की मग उपवर-वधूची परीक्षा लागते. असाच एक विवाह मालेगावातील संगमेश्वरमध्ये पार पडला, ज्याची एकच चर्चा आहे.
कोरोना साथीमुळे दोन वर्ष बंधनात असलेले सोहळे यंदा धुमधडाक्यात होत आहेत. आप्त, परिचितांना विवाहांना हजेरी लावताना दमछाक होतेय. त्यावरुन एकसुरी चर्चा सर्वत्र एकायला मिळत असताना संगमेश्वरातील एका लग्नाची गोष्ट चांगलीच वायरल होत आहे.
मनपाचे सेवानिवृत्त कर्मचारी अशोक पगारे यांचा मुलगा राहुल हा वयात आला तशी घरच्यांकडून वधू शोध मोहीम सुरु झाली. मात्र, त्यात उंची आडवी आली. राहुल याची उंची चार फूट सहा इंच. लग्न करताना अनेक बारकावे पाहिले जातात. नोकरी, धंदा, शेती, घरदार, रंग आणि उंची. सर्वकाही योग्य असले तरी सोयरीक जुळेलच याचीही काही शाश्वती नसते. तेव्हा आहेर कुटुंबापुढे मोठे आव्हान होते. त्यांची चांगलीच दमछाक झाली. पण म्हणतात ना, ‘रब ने बना दी जोडी’. तसाच काहीसा प्रयत्य आला. लग्नाच्या गाठी या स्वर्गातच बांधल्या जातात, तशी राहुलला वंदना लाभली. जशी अवस्था आहेर कुटुंबाची तसाच अनुभव गारेगावमधील जगताप कुटुंब घेत होते. योग्य वर आणि वधू एवढा एकच समानधागा दोघांचा राहिला. कै. प्रभाकर मोतीराम जगताप यांची कन्या वंदना हिची उंचीही चार फूट. दोन्ही विश्वकर्मा समाजाचे असल्याने आप्त-नातेवाईकांच्या माध्यमातून या दोन्ही कुटुंबाची सोयरिक जुळली. वंदनाचे (20) बारावीपर्यंतचे शिक्षण झालेले तर राहुल (30) हा खासगी दुकानात नोकरीला. पसंती होऊन बुधवारी (दि.25) थाटामाटात विवाह संपन्न झाला. या देखण्या सोहळ्याची एकच चर्चा होत आहे.
मालेगाव : राहुल पगारे आणि वंदना जगताप या वधू-वरांची रथातून काढण्यात आलेली वरात. दुसर्या छायाचित्रात हळदीच्या कार्यक्रमात वधू-वरांना खांद्यावर घेऊन नाचताना आप्त.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम