शिवसेनेची साडेसाती सुरू ; परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीच्या छाप्याने खळबळ

0
20

शिवसेनेची चिंता वाढली असून राज्याचे परिवहन मंत्री तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने आज पहाटे छापा टाकला आहे. आज सकाळीच ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानी छापा मारला आहे. यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

सूत्रांच्या माहतीनुसार अनिल देशमुख यांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई झाली असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल परब यांच्यावर ईडीने छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. या छाप्यामुळे सेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे

आज सकाळी ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवास्थान ‘अजिंक्यतारा’ आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापा मारला आहे. आज सकाळी 6.00 वाजण्याच्या सुमारास ईडीने छापा मारला आहे. अतिशय गोपनीय माहिती ठेवत हा छापा टाकला आहे

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली होती. पोलीस बदली प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. त्याशिवाय, अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्ट प्रकरणात ही कारवाई झाली असल्याचे म्हटले जात आहे. ईडीने दापोली रिसॉर्ट प्रकरणात गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे. शिवसेनेची अद्याप यावर प्रतिक्रिया आलेली नसून सर्व्यांचे लक्ष संजय राऊत यांच्याकडे लागून आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here