हेडफोन घालून रेल्वे रुळ क्रॉस करण जीवावर बेतले

0
70

द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : रस्त्यावरून चालताना थोडा विरंगुळा व्हावा म्हणून अनेकजण कानामध्ये हेडफोन घालून चालतात. हेडफोन घातल्यावर आपल्याला आजू बाजूच्या वाहनांचा आवाज ऐकू येत नाही.

आपली ही साधी सवय आपल्या जीवावर बेतू शकते. जळगाव येथे  असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडला आहे. कामावरून घरी जात असताना तरुणीने कानात हेडफोन घातले होते. आणि ती रेल्वे रूळ क्रॉस करत होती. हेडफोन मुळे तिला रेल्वेचा आवाज ऐकू आला नसेल. सुसाट वेगाने येत असलेल्या रेल्वेचा जबरदस्त धक्का तरुणीला बसला. या धक्कामुळे तरुणी दूर अंतरावर फेकली गेली. गंभीर जखम झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. जळगावातील शिवाजी नगर भागात ही भयंकर घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत तरुणी कोण आहे ? 

सदर घटनेमध्ये मृत्यू झालेल्या मुलीचं नाव स्नेहल वैभव उज्जैनकर (वय-१९) असे आहे. स्नेहल उज्जैनकर ही आपल्या आई-वडिलांसमवेत शिवाजी नगर परिसरातील धनाजी काळे नगरात राहत होती. ती शहरातील कॉसमॅटीक दुकानात नोकरी करत होती. रोजच्या सारखं २३ मे रोजी रात्री स्नेहल कामावरून घरी चालत निघाली होती. स्नेहलने हेडफोन लावले होते. जळगाव तहसील कार्यालया नजिक शिवाजी नगरात जाण्याकरिता रेल्वेरूळ क्रॉस करत असतांना भुसावळकडून जळगावकडे येणाऱ्या धावत्या सुरत पॅसेंजर गाडीचा जोराचा धक्का लागल्याने स्नेहल जागीच ठार झाली.

अकस्मात मृत्यूची नोंद

शिवाजी नगर मध्ये घडलेल्या या घटनेची माहिती मिळता लोहमार्ग पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आहे. लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नेला आहे. पोलीस ठाण्या मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा प्राथमिक तपास लोहमार्ग पोलीस कर्मचारी सचिनकुमार भावसार आणि किशोर पाटील करीत आहेत.

 

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here