अमेरिकेत १८ वर्षीय हल्लेखोराकडून ३ शिक्षक , १८ विद्यार्थ्यांवर गोळीबार

0
207

द पॉइंट नाऊ ब्यूरो : अमेरिकेमधील टेक्सास येथील प्राथमिक शाळेत गोळीबार झाला असल्याची घटना समोर आली आहे. १८ वर्ष असलेल्या हल्लेखोराने शाळेत घुसून गोळीबार केला. या गोळीबारामध्ये २१ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन शिक्षक आणि १८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या हल्ल्या प्रकरणात राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी चिंता व्यक्त केली आहे. नव्याने बंदुकींवर बंदी आणण्यासंबंधी त्यांनी भाष्य केले आहे. तसंच आपण कधी या गन लॉबीविरोधी भूमिका घेणार आहोत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

समोर आलेल्या माहितीप्रमाणे, टेक्सासमधील उवाल्डे शहरात हा गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. १८ वर्षीय हल्लेखोराने रॉब या प्राथमिक शाळेत अंदाधुंद गोळीबार केला आहे. या हल्ल्यात १८ विद्यार्थी तर तीन शिक्षकांनी आपले प्राण गमावावर लागले आहेत. गोळीबार केलेल्या हल्लेखोराला ठार करण्यात आले आहे. तो उवाल्डे हायस्कूलमधील विद्यार्थी होता.

हल्लेखोराने आजीवर देखील हल्ला केला

हल्लेखोरासंबंधात मोठा खुलासा झाला आहे. सीएनएनने सूत्रांकडून  मिळालेल्या माहितीनुसार, शाळे मध्ये येण्याआधी हल्लेखोराने आपल्या आजीस गोळी घातली होती. आजीला सॅन एंटोनियो रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार प्रक्रिया सुरु आहेत. आजीला गोळी घालून हल्लेखोर फरार होता. मात्र, तो नंतर शाळेत पोहोचला आणि विद्यार्थ्यांवर गोळीबार केला.

टेक्सास मधील सार्वजनिक सुरक्षा विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार, गोळीबार करण्यापूर्वी हल्लोखोरासोबत दोन घटना घडल्या. सर्वप्रथम त्याने आपल्या आजीला गोळी घातली. नंतर शाळेजवळ एका वाहनास धडक दिली. अधिकाऱ्यांच्या  माहितीनुसार, शाळेत येण्याआधी हल्लेखोराने बुलेटप्रूफ जॅकेट व हातात बंदुक घेत शाळेत प्रवेश केला होता. नंतर तो शाळेतील वेगवेगळ्या वर्गात जाऊन गोळीबार करत होता. या गोळीबारात २१ जणांना आपला जीव गमवावा लागला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here