‘कोरोना गेला अन् आता’ ‘मंकी पॉक्स’ आला ; सांगा आता जगायचे कसे ?

0
34

द पॉइंट नाऊ ब्युरो : गेल्या दीड वर्षांपासून पूर्ण जग कोरोना महामारीशी लढा देत आहे. यातून बाहेर येण्याच पूर्ण जग प्रयत्न करतो आहे आणि अशातच आणखी एक नवीन संसर्गजन्य आजार होत असल्याचे समोर आले आहे. अमेरिकेतील आणि टेक्सास शहरात मंकीपॉक्स या नवीन संसर्गजन्य आजाराचा रुग्ण सापडला आहे. ‘सेंटर फॉर डिजीज कंट्रोल एंड प्रीव्हेंशन’ (CDC) यांच्या करून शुक्रवारी याबाबत माहिती दिली आहे. मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण टेक्सास येथे आढळला आहे. हा रुग्ण नायजेरिया ते अमेरिका असा प्रवास केला आहे. या रुग्णावर डलास येथे उपचार सुरु आहेत.

डलास काऊंटी जज क्ले जेनकिन्स यांनी मंकीपॉक्स या रोगाबद्दल माहिती देताना सांगितले आहे की, सध्या तरी या रुग्णांपासून कोणताही धोका नाही. नायजेरिया सोडल्यास आफ्रिका खंडात मंकीपॉक्स या रोगाचा प्रकोप १९७० च्या दरम्यान पाहायला मिळाला होता. CDC ने दिलेल्या माहितीनुसार, २००३ मध्ये मंकीपॉक्स या आजाराने अमेरिकेत तांडव घातला होता. मंकीपॉक्स झालेल्या रुग्णाची प्रवासाची सर्व माहिती काढण्याचं काम सुरु आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी केली जाणार असल्याचे सीडीसीने सांगितले आहे.

मंकीपॉक्स व्हायरस हा जवळजवळ स्मॉलपॉक्स व्हायरससारखा आहे. तज्ज्ञांच्या म तानुसार, हा आजार तितका घातक नाही आणि त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यताही तशी कमी आहे. मंकीपॉक्सची बहुतेक रुग्ण सौम्य असतात. काही आठवड्यांमध्ये हा आजार बरा होतो. पण कधी कधी मात्र हा आजार गंभीरही होऊ शकतो. श्वसनातून हा आजार पसरतो.

काय आहे मंकीपॉक्स व्हायरस ?

मंकीपॉक्स हा जुना आजार आहे. १९७० मध्ये हा आजार आफ्रिकन देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळला होता. सध्याही काही ठिकाणी या रोगाचे रुग्ण आढळतात. उष्णकटिबंध परिसरात, मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतील देशातील दुर्गम भागात हा व्हायरस पसरत आहे. त्यामुळेच या व्हायरसचे पश्चिम आफ्रिकी आणि मध्य आफ्रिकी असे दोन मुख्य प्रकार आहेत.

काय आहेत लक्षणं ?

  • सुरुवातीस ताप, सूज
  • चिकनपॉक्ससारखेच त्वचेवर पुरळ येणे
  • तापानंतर असे पुरळ येऊ लागतात.
  • डोकेदुखी, कमरदुखी, स्नायूमध्ये वेदना, चेहऱ्यावर पुरळ येऊन ते मग शरीरावर पसरतात दोन ते तीन आठवडे हा व्हायरस शरीरात राहू शकतो.
  • सामान्यतः हात, हाताचे पंजे आणि पायांच्या तळव्यावर पुरळ येतात.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here