
देवळा : तालुक्यातील खर्डे येथे देवळा तहसील कार्यालयाकडून” महास्वराज्य अभियान, प्रशासन आपल्या दारी”हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला . तालुक्यातील पश्चिमेकडीलअति दुर्गम असलेल्या खर्डे येथे या अभियानात नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा एकाच दिवसात निपटारा करून शासन खरोखरच नागरिकांच्या दारात जाऊन समस्या सोडविण्याच्या मोहिमेचे कौतुक करण्यात आले .

महास्वराज्य अभियानात प्रत्येक महसूल मंडळाच्या एकेक गावात प्राथमिक टप्प्यात शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे . या अभियानात उत्पन्न , रहिवाशी , जातीचे , नॉन क्रिमिलियर आदी दाखले वाटप , संजय गांधी योजना अर्ज स्वीकृती व लाभ मंजुरीचे आदेश वाटप , नवीन शिधापत्रिका , दुय्यम शिधा पत्रिका वाटप ,नाव कमी करणे , समाविष्ठ करणे , वारस नोंद , सात बारा व आठ अ चे वाटप करणे , मतदान ओळखपत्र वाटप , नवीन नाव नोंदणी ,नाव वगळणे ,इ पीक पहाणी , पोट खराबा वर्ग अ मधील जमीन लागवडीलायक आणणे बाबत माहिती देणे आदी कामांची यावेळी कार्यवाही करण्यात आली .
यावेळी खर्डेसह , कनकापूर , कांचणे ,शेरी ,वार्शी , मुलूखवाडी ,हनुमंतपाडा आदी गावातील नागरिक उपस्थित होते . उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले . या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला . देवळ्याचे तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार विजय बनसोडे यांच्या प्रयत्नातुन हा उपक्रम राबविण्यात आला . यावेळी तहशीलदार विजय सूर्यवंशी ,खर्डे येथील प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा जाधव यांनी मनोगत व्यक्त केले . खर्डे येथील तलाठी उमेश गोपनारायण यांनी प्रस्ताविकात अभियानाचा उद्देश समजून सांगितला . माजी उपसरपंच राहुल देवरे यांनी आभार मानले . यावेळी खर्ड्याचे माजी सरपंच जगन्नाथ माळी , माजी उपसरपंच भारत देवरे , सेवानिवृत शिक्षक सुकदेव देवरे , प्रहारचे अर्जुन देवरे , वार्शीचे माजी सरपंच बळीराम पवार , मंडळ अधिकारी राम परदेशी , पुरवठा अधिकारी एस जी भामरे ,वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष आडे , खर्डे ग्रामविकास अधिकारी योगेश पगार , वार्शी ग्रामसेविका राजश्री देसले , कनकापूर ग्रामसेविका जयश्री भामरे ,शेरी ग्रामसेवक रुपेश आहेर आदींसह पंचक्रोशीतील नागरिक
मोठ्या संख्येने उपस्थित होते .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम