द पॉईंट नाऊ ब्युरो : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या कारणाने एका मुलाला 15 दिवस गोशाळेत काम करण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
सध्या सोशल मीडिया हे एक महत्त्वपूर्ण मध्यम बनलेले आहे. मात्र या माध्यमाचा आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा दुरुपयोग होण्याचे अनेक प्रकार सध्या घडतांना दिसून येत आहेत. त्यात राजकीय व्यक्तिमत्वांवर अतिशय खालच्या दर्जाच्या शब्दांचा वापर करून टीका केल्याच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर मागील काही दिवसांत पोस्ट केल्या गेल्या. या कारणास्तव बऱ्याच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
उत्तर प्रदेश येथेही बदायु मध्ये एका 15 वर्षांच्या मुलाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने न्याय बोर्डाने या मुलाला 15 दिवस गोशाळेत काम करण्याची शिक्षा सुनावली आहे. तर पुढील 15 दिवस सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे काम व 10 हजार रुपये दंड देखील या मुलाला सुनावण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम